पाकिस्तानी क्रिकेटपटूने केली धोनीची स्तुती ; म्हणाला की…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी बऱ्याच दिवसापासून क्रिकेट पासून दूर आहे,तसेच भारताच्या या सर्वात यशस्वी कर्णधाराच्या निवृत्तीची चर्चाही अधून मधून येत असते.अशातच आता पाकिस्तानचा खेळाडू कामरान अकमलने मात्र धोनीवर स्तुतिसुमने उधळली आहेत.

“धोनी हा भारताला मिळालेला आतापर्यंतचा सर्वात प्रतिभावान यष्टीरक्षक आणि फलंदाज आहे. त्याने भारतासाठी अनेक विजेतेपदे मिळवली आहेत. त्याच्या कामगिरीत कमालीचे सातत्य आहे. पाकिस्तानात आमच्या तोंडचा घास पळवून न्यावा तशी त्याने क्रिकेट मालिका भारताला जिंकवून दिली होती. धोनीची प्रतिभा अविश्वसनीय आहे. महेंद्रसिंग धोनीच्या प्रतिभेबद्दल अधिक बोलायचं झालं तर वन डे विश्वचषक, टी २० विश्वचषक, IPL, चॅम्पियन्स ट्रॉफी… धोनीच्या नेतृत्वाखाली त्याच्या हाताखालील संघाने सर्व प्रकारच्या ट्रॉफी जिंकल्या आहेत. धोनी हा खरंच एक अप्रतिम खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये धोनीसारखे खेळाडू कमीच पाहायला मिळतात”, असे अकमल म्हणाला.

या“धोनी हा नशिबवान कर्णधार होता. २०११ च्या विश्वचषक संघाचे नेतृत्व करणं फारसं अवघड नव्हतं. कारण संघात सचिन, सेहवाग, मी, युवराज, युसूफ, विराट सगळेच प्रतिभावंत खेळाडू होते. गांगुलीने या साऱ्यांना एकत्र घेऊन संघ घडवला आणि उभा केला. पण धोनीला मात्र ‘रेडीमेड’ संघ मिळाला”, असे मत माजी खेळाडू गौतम गंभीरने व्यक्त केले होते. त्यावर, “सौरव गांगुलीने देशाला अनेक मॅच-विनर खेळाडू दिले हे गंभीरचं म्हणणं योग्य आहे. पण धोनीकडे कर्णधारपद आल्यानंतर त्याचंही काम खूप कठीण होतं. यावेळी धोनीसारख्या कर्णधाराचीच गरज होती. त्याने संघातील साऱ्या खेळाडूंना नीट पद्धतीने हाताळले आणि संघ भक्कम केला”, असं मत माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने व्यक्त केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like