परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
पालम शहराच्या मुख्य चौकात बुधवारी सायंकाळी दोन गटात झालेला वादाचे रुपांतर मोठ्या प्रमाणात जाळपोळ ,हाणामारी व दगडफेक मध्ये रुपांतरीत झाल्याने शहरातील वातावरण तापले आहे. मुख्य बाजारपेठ तातडीने बंद करण्यात आली असून समाजकंटकांनी केलेल्या जाळपोळीने शहरात दहशतीचे वातावरण आहे .
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून शहरात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बाजारपेठेतील अनेक दुकानांना लक्ष करण्यात आल असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार पालम शहरात दोन गटातील युवकाच्या झालेल्या वादावादीचे रुपांतर हाणामारी व नंतर जाळपोळीत झालं आहे . शहरात कमालीची तणावाची स्थिती निर्माण झाली असुन मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
काही दुचाकीचीही जाळल्या असुन काही दुकानावर दगडफेक झाल्याची माहिती मिळतेय . घटनेनंतर शहरातील बाजारपेठ लगेच बंद झाली आहे. शहरात पोलीस फोर्स दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आहे .