सोलापूरच्या लेकीची कौतुकास्पद कामगिरी! पल्लवी काळे नौदल परीक्षेमध्ये देशात दुसरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामधील भोगेवाडी गावातील पल्लवी काळे ही तरुणी नौदल परीक्षेत देशात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. भोगेवाडी गावातील व्यवसायाने शेतकरी असलेल्या सुनील काळे पल्लवी ही कन्या आहे. भोगेवाडीसारख्या खेडे गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पल्लवीची भारतीय नौदल कोस्ट गार्ड असिस्टंट कमांडन्ट पदासाठी निवड झाली आहे. त्यामुळे तीच्या या यशाने सगळ्या गावात आनंदाचे वातावरण आहे. सर्वच स्तरातून सध्या पल्लवीचं कौतूक होतं आहे.

दरम्यान भोगेवाडी गावातील अनेक तरुण भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत आहेत. त्यातच आता पल्लवीच्या रूपाने गावाला नौदलातील पहिली महिला अधिकारी मिळणार आहे. प्रचंड मेहनतीच्या जोरावर पल्लवीने केंद्रीय स्टाफ सिलेक्शनकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत दुसरा क्रमांक पटकावला. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पल्लवीने हे यश पदरात पाडलं आहे. दरम्यान ‘प्रत्यकाने आई वडिलांच्या कष्टांची जाण बाळगून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ध्येय सत्यात उतरवण्यासाठी अभ्यासात सातत्य, सकारात्मक विचार आवश्यक असल्याची’ भावना पल्लवीने या यशानंतर बोलून दाखवली.

Leave a Comment