हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Palm Oil Benefits) आपण काय खातो याचा आपल्या शारीरिक आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे आहाराबाबत जागरूक असणे अत्यंत गरजेचे आहे. एखादा पदार्थ फोडणीला घालायचा असेल तर त्यातील सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे तेल. आपल्या आहारात आपण जे तेल वापरतो त्यामुळे आपल्या आरोग्याचे एकतर नुकसान होऊ शकते किंवा नुकसान होण्यापासून बचाव होऊ शकतो. बऱ्याच लोकांचा समज आहे की, पाम तेलाचा वापर करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
पाम तेल हे गुणवत्तेने कमी असल्याचे म्हणत बरेच लोक याचा वापर टाळतात. इतकंच काय तर पाम तेलाचा वापर करून बनवलेले पदार्थ सुद्धा भेसळयुक्त असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे लोक आपल्या आहारात पाम तेलाचा वापर टाळतात. (Palm Oil Benefits) असे असताना नुकतेच ICMR च्या तज्ञांनी केलेल्या अभ्यासात समोर आले आहे की, मध्यम प्रमाणात पाम तेलाचे सेवन केल्यास आरोग्याला बराच फायदा होऊ शकते. खास करून रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी पाम तेल उपयुक्त ठरू शकते. याशिवाय पाम तेलाचे इतर काय फायदे आहेत हे देखील तज्ञांनी सांगितले आहेत. ते जाणून घेऊया.
पोषणयुक्त पाम तेल
पाम तेलात सॅच्युरेटेड फॅट्स असतात. जे खराब कोलेस्टेरॉल वाढवू शकते. पण, तेच निरोगी मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्ससुद्धा वाढवू शकते. शिवाय पाम ऑइलमध्ये अ आणि ई जीवनसत्त्वे असतात. (Palm Oil Benefits) ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढू शकते. तसेच पाम तेलात असणारे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सच्या नुकसानाशी लढण्याची ताकद देतात. त्यामुळे पाम तेल बऱ्याच प्रमाणात लाभदायी ठरू शकते. ते कसे हे जाणून घेऊ.
सर्टिफाईड पाम तेल वापरा
तज्ञांनी सांगिल्याप्रमाणे, आपल्या आहारात RSPO (राऊंडटेबल ऑन सस्टेनेबल पाम ऑइल) सर्टिफिकेट असणारे पाम तेल निवडा. (Palm Oil Benefits) उत्पादनावर छापलेले तपशील वाचल्यास तुम्हाला तेलाचा दर्जा समजून येईल.
प्रमाणात करा वापर
इतर खाद्य तेलांप्रमाणेच पाम तेलाचा वापरदेखील प्रमाणात केल्यास आरोग्यास चांगला फायदा होऊ शकतो. (Palm Oil Benefits) कारण सॅच्युरेटेड फॅटचे सेवन अधिक प्रमाणात केल्यास हृदयाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
आहारातील संतुलन
फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिने असलेल्या संतुलित आहाराचा एक भाग म्हणून पाम तेलाचा वापर करावा. (Palm Oil Benefits) असे केल्यास आहारात संतुलन राहील आणि प्रत्येक घटकाचा आरोग्याला चांगला फायदा मिळेल.
पाम तेलासोबत करा स्मार्ट कुकिंग (Palm Oil Benefits)
पाम तेलाचा वापर तुम्ही कशा पद्धतीने करताय त्यावर हे तेल हानिकारक ठरणार की आरोग्यदायी ते ठरते. तळणे आणि बेकिंग यांसारख्या कमी उष्णता आवश्यक असलेल्या कुकिंग पद्धतींसाठी पाम तेलचा वापर करता येईल. मात्र, तळण्यासारख्या उच्च- तापमान आवश्यक असणाऱ्या पद्धतींसाठी पाम तेलाचा वापर करणे हानिकारक ठरू शकते. अशावेळी अधिक उष्णता आवश्यक असणाऱ्या पदार्थांमध्ये ऑलिव्ह ऑईल किंवा कॅनोला तेलसारख्या आरोग्यदायी तेलांसोबत पाम तेलाचे मिश्रण करा आणि मग त्याचा वापर करा.