आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्च 2020 पर्यंत मुदतवाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : 31 डिसेंबर पर्यंत आधार आणि पॅनकार्ड लिंक न केल्यास पॅनकार्ड निष्क्रिय होईल अशी माहिती पुढे येत असतानाच सरकारने अजूनही ज्यांनी आधार आणि पॅन लिंक केलेले नाही अशा नागरिकांना दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे. सध्याची मुदत 31 डिसेंबर 2019 म्हणजेच उद्या संपणार होती. मात्र आधार-पॅन लिंक करण्याची मुदत मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे. आत्तापर्यंत मुदतवाढ देण्याची ही आठवी वेळ आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एक निर्णय दिला होता. ज्यानुसार आधार कार्ड आयकर परतावा भरण्यासाठी आणि पॅन कार्ड हवं असल्यास बंधनकारक आहे. 1 जुलै 2017 पासून पॅन कार्ड असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड मिळण्याचा अधिकार आहे.

Leave a Comment