Pan Card And Adhar Card Link | आजकाल आधार कार्ड इतर गोष्टींना लिंक करणे खूप गरजेचे असते. खास करून आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक करणे गरजेचे असते. आणि आता हे लिंक करणे खूप सोपे झालेले आहे. तुम्ही जर नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी अर्ज करत असाल, तर त्यासाठी आधार कार्ड देणे आजकाल अनिवार्य आहे. परंतु आता यासाठी तुम्हाला इतर कुठेही जायची गरज नाही. तुम्ही घर बसल्या तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड एसएमएसद्वारे एकमेकांना लिंक करू शकता.
आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक (Pan Card And Adhar Card Link) करणे. ही आता भारतातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. हे लिंक करण्यामागे अनेक कारणे आहेत. तुम्ही जर आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक केले, तर सरकार कर चोरी रोखण्याचा देखील प्रयत्न करते. तसेच एक व्यक्ती एकापेक्षा जास्त पॅन कार्ड देखील काढू शकत नाही. दोन्ही पण लिंक करून पारदर्शकता येते. त्याचप्रमाणे अनेक सरकारी योजनांचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक करणे खूप गरजेचे असते. यासाठी बचत खाते उघडणे गुंतवणूक करणे यासाठी आधार कार्ड आणली पॅन कार्ड एकमेकांना लिंक करणे आवश्यक असते.
आधार कार्ड पॅन कार्ड एकमेकांना लिंक कसे करायचे? | Pan Card And Adhar Card Link
- आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून 5676878 किंवा 56161 यापैकी एका नंबरवर तुम्हाला एसएमएस पाठवायचा आहे.
- यासाठी तुम्हाला UIDAI PAN < तुमचा 12 अंकी आधार क्रमांक > < तुमचा 10 अंकी पॅन क्रमांक >
- त्यानंतर सेंट हे बटन दाबा
- तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांची लिंक झाले आहे की नाही. हे तपासण्यासाठी तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाईटला भेट देऊ शकता.
- तुम्ही जर आधीच विवरणपत्र दाखल करत असेल, तर तुमचे आधार आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक असण्याची गरज आहे.
- तुम्ही वर दिलेल्या सोप्या स्टेप्सनुसार एसएमएसद्वारे लिंक करू शकता.