हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pan Card हे आजकाल अनेक महत्वाच्या डॉक्युमेंट्सपैकी एक बनले आहे. याशिवाय कोणतेही आर्थिक काम करणे जवळपास अशक्यच आहे. मात्र, आपल्या मनात कधी अशा प्रश्न डोकावला का कि,एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पॅन कार्डचे काय होईल ??? हे लक्षात घ्या कि, कोणत्याही पण कराड धारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कायदेशीर वारसाला मृत व्यक्तीचे पॅनकार्ड सरेंडर करावे लागते. कारण मृत्यूनंतर ते व्हॅलिड मानले जात नाही. त्यामुळे सर्वात आधी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे मृत व्यक्तीचे पॅनकार्ड जमा करावे लागेल.
मात्र इथे हे लक्षात घ्या कि, अनेक आर्थिक कामांसाठी Pan Card आवश्यक असल्याने कार्डधारकाच्या मृत्यूनंतर ते लगेचच सरेंडर करू नये. यामुळे कदाचित काही आर्थिक कामांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतील. जसे कि, बँकेमध्ये जमा असलेले पैसे ट्रान्सफर करणे आणि कायदेशीर वारसांच्या नावावर मालमत्ता करणे. त्याचप्रमाणे पॅन कार्ड सरेंडर करताना पॅन कार्डधारकाच्या मृत्यूचे प्रमाणपत्रही द्यावे लागेल. तसेच कायदेशीर वारसाला मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावाने बाकी असलेला टॅक्स देखील भरावा लागेल.
तसे पहिले तर मृत व्यक्तीचे Pan Card सरेंडर करणे बंधनकारक नाही. कायद्यानुसार यासाठी कोणता दंड देखील लागू होत नाही. मात्र, त्याच्या गैरवापर करून भविष्यात फसवणूक होऊ नये यासाठी पॅनकार्ड सरेंडर करण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातो.
मृत व्यक्तीचे Pan Card सरेंडर करण्याची प्रक्रिया जाणून घ्या
यासाठी मृत व्यक्तीचे पॅन कार्डची नोंदणी कोणत्या अधिकारक्षेत्रात केली आहे हे जाणून घ्यावे लागेल. त्यानंतर मूल्यांकन अधिकाऱ्याकडे एक अर्ज द्यावा लागेल.
यामध्ये कार्डधारकाचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, मृत्यूचे कारण लिहावे लागेल.
यानंतर तो अर्ज जवळच्या AO ऑफिस किंवा इन्कम टॅक्स ऑफिस (ASK) ला द्यावा लागेल. यासोबतच संबंधित कागदपत्रेही द्यावी लागतील.
पॅन कार्ड सरेंडरचा अर्ज सबमिट केल्यानंतर, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून त्याची पार्श्वभूमी तपासली जाईल. तसेच मृत व्यक्तीच्या PAN वर कोणती थकबाकी तर नाही ना हे देखील तपासले जाईल.
जर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला मृत व्यक्तीच्या नावावर कोणतीही थकबाकी आढळली नाही तर ते पॅन कार्ड इनऍक्टिव्ह केले जाईल.
पॅन कार्ड इनऍक्टिव्ह केल्यानंतरही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या डेटाबेसमध्ये सर्व डेटा राहील.
तसेच भविष्यातील संदर्भासाठी केलेल्या अर्जाची फोटोकॉपी जपून ठेवा.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html
हे पण वाचा :
फक्त 14 हजार रुपयांत मिळवा iPhone 13 Pro Max, खरेदी करण्यासाठी लोकांची उडतेय झुंबड
Skoda Octavia : आणखी एक जबरदस्त कार भारतात होणार बंद, जाणून घ्या त्यामागील कारण
LIC च्या ‘या’ सुपरहिट योजनेत एकदाच पैसे जमा करून आजीवन मिळवा 50,000 रुपयांची पेन्शन
आता Netflix वर फ्रीमध्ये पहा चित्रपट, फार कमी लोकांना माहीत आहे ‘हा’ जुगाड
Amazon वर बंपर सेल! 20 हजार रुपयांचा TV मिळतोय केवळ Rs 9,499 ला; पहा Offer लिस्ट