महाराष्ट्रात आहे असं ठिकाण जिथे 7 नद्या एकत्र येतात; काय आहे धार्मिक महत्व ?

7 river maharashtra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कडेकपारीत निसर्गसौंदर्याचा खजिना लपलाय. महाराष्ट्रात दऱ्या, डोंगर, धबधबे आणि नद्या आहेत. एवढेच नव्हे तर अध्यात्मिक महत्व मिळवून देणारी प्राचीन मंदिरेही महाराष्ट्रात आहेत. म्हणूनच महाराष्ट्रात विदेशातून अनेक जण पर्यटनासाठी येतात. महाराष्ट्रात माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे आहेत. महाबळेश्वरला नैसर्गिक सौंदर्याची देणगी मिळाली असून अध्यात्मिक वारसाही लाभला आहे. येथील पंचगंगा मंदिर प्रसिद्ध असून एकाच ठिकाणाहून सात नद्यांचा उगम झालेले हे एकमेव जगातील स्थान आहे. हे ठिकाण सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे आहे.

कोयना, कृष्णा, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या 5 विविध नद्या या मंदिर परिसरात एकत्र आल्या आहेत. इथे 5 नद्यांचा संगम झाला आहे; म्हणून या संगमाला ‘पंचगंगा’ असे म्हटले जाते. या 5 नद्यांचे पाणी एकत्र येत गायमुखातून कुंडात पडते. या 5 नद्यांचा संगम होणारा ‘पंचगंगा संगम’ इथे असताना सरस्वती आणि भागीरथी या दोन नद्याही इथे एकत्र येतात. परंतु ठराविक वेळीच या 2 नद्यांचा संगम होतो.

पंचगंगा मंदिर ऐतिहासिक वारसा लाभलेले मंदिर असून साधारणत: 600 वर्षांपूर्वीचे असल्याचे म्हटले जाते. पुराण कथेत पंचगंगा मंदिराचा उल्लेख असून या मंदिरातून कोयना, कृष्णा, गायत्री, सावित्री आणि वेण्णा नद्यांचा उगम झाल्याचे म्हटले आहे. पंचगंगेचे मंदिर 17 व्या शतकात बांधण्यात आले आहे. या ठिकाणी पाच नद्या उगम पावतात. कृष्णेच्या मूर्तीजवळ दर बारा वर्षांनी कन्यागत पर्वात उत्तरेकडून भागीरथी कृष्णेस भेटावयास येते तर दर साठ वर्षांनी कपिलाष्टीच्या योगावर सरस्वती नदी गायत्रीस भेटावयास येते. हे पाच नद्यांचे प्रवाह उगम स्थानांना एकत्र करून ते पाणी गोमुखातून कुंडात सोडलेले आहे त्यास ब्रहकुंड म्हणतात. शेजारी विष्णुकुंडही आहे. याविष्णूकुंडात सात बहिणी गुप्त होऊन पूर्वेच्या श्रीमहाबळेश्वर मंदिरात एकत्र आलेल्या आहेत. या ठिकाणी तशी प्रतिकृती आहे.

महाबळेश्वरमधील पवित्र स्थानांपकी एक पंचगंगा मंदिर आहे. येथे पाच नद्यांच्या संगमामुळे पंचगंगा नाव दिले आहे. सर्व नद्या पंचगंगा मंदिरातील दगडांच्या बाहेर कोरलेल्या गोमुखातून बाहेर येतात. हे प्रसिद्ध मंदिर देवगिरीचे यादव घराण्यातील राजा सिंघेदेव यांनी 13 व्या शतकात बांधले होते. 16 व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मंदिराची डागडुजी केली होती. श्री क्षेत्र महाबळेश्वर येथून 6 किमीवर ऐतिहासिक वारसा लाभलेले पंचगंगा मंदिर आहे. शिवलिंग स्वयंभूखडकातून असून रुद्राक्षाकृती खाचखळग्यातून सतत पाणी वाहत असते. शिवलिंग असले तरी या ठिकाणी पिंड नाही. नैसर्गिक कलाकृती निर्माण झालेली आहे. पंचगंगेच्या मंदिराबाहेर अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले रुद्रेश्वर व रुद्रतीर्थ मंदिर भग्नावस्थेत आहेत. पंचगंगा व महाबळेश्वर मंदिरादरम्यान अतिबलेश्वर मंदिर आहे.