हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pandava Temple) आपल्या महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, हे आपण सारेच जाणतो. त्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी विविध देवीदेवतांची पुरातन तसेच प्राचीन मंदिरे पहायला मिळतात. यांपैकी काही मंदिरे लोकांना ठाऊक असली तरी मंदिरे मात्र दुर्लक्षित झाली आहेत. आज आपण महाराष्ट्रातील पाच पांडव मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. या मंदिराबद्दल विशेष सांगायचे म्हणजे, संपूर्ण भारतात पाच पांडव आणि द्रौपदीचे एकत्र अशी दोनच मंदिरे आहेत. त्यापैकी एक दिल्लीत आणि एक महाराष्ट्रात आहे. चला तर महाराष्ट्रातील हे मंदिर कुठे आहे आणि त्याचा काय इतिहास आहे? हे जाणून घेऊया.
कुठे आहे? (Pandava Temple)
महाराष्ट्रात जुना मुंबई- पुणे महामार्गालगत तळेगाव दाभाडे हे ठिकाण आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेले तळेगाव दाभाडे हे पुण्यापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर असून याच ठिकाणे हे पाच पांडव आणि द्रौपदीचे अलौकिक मंदिर आहे.
मंदिराचे वैशिट्य
या मंदिराचे तोंड पूर्वमुखी असून आकाराने हे मंदिर बरेच लहान आहे. मंदिराच्या दरवाज्यातून आता पाहता आपल्याला ५ पांडवांच्या बैठ्या मुर्त्या दिसतात. यामध्ये धर्मराज युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव अशा पाच पांडवांच्या बैठक मांडून मांडलेल्या मूर्तींचे दर्शन होते. (Pandava Temple) दरम्यान धर्मराज युधिष्ठिर आणि भीम या दोन मुर्तींच्या मधोमध एक छोटासा दरवाजा दिसतो. त्यातून आता पाहिले असता एका छोट्याशा चौथऱ्यावर द्रौपदी एका कुशीवर नीजलेल्या अवस्थेत दिसून येते. असं म्हणतात की, वषार्तून दोन वेळा द्रौपदी ६ महिन्याने पूर्वेकडे व पश्चिमेकडे मुख करून विश्रांती घ्यायची.
मंदिराचे बांधकाम
पाच पांडव आणि द्रौपदीचे हे स्थान अत्यंत ऐतिहासिक आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक वारसा जतन करून ठेवण्यासाठी पाच पांडव आणि द्रौपदीच्या मूर्तींना रंगरंगोटी केली जाते. श्रीमंत सरसेनापती दाभाडे यांच्या घराण्याने या मंदिराची रंगरंगोटी व डागडुजी केली आहे. हे मंदिर एका दगडी चौथ्यावर उभे असून आकाराने फार लहान आहे. (Pandava Temple) मंदिराच्या पाच- सहा पायऱ्या चढून आपण आतमध्ये प्रवेश केला असता पाच पांडवांच्या साधारण साडेचार फूट उंचीच्या बैठ्या मुर्त्या लक्ष वेधून घेतात. एका सरळ ओळीत बसलेल्या पांडवांच्या मागील खोलीत द्रौपदीचे निजलेल्या अवस्थेत दर्शन होते.
मंदिराचा इतिहास
पूर्वीच्या काळात या मंदिराबाबत एक आख्यायिका सांगितली जायची. ही आख्यायिका अशी होती की, द्रौपदी दर ६ महिन्यांनी कूस बदलते. ६ महिने पूर्वेकडे तर ६ महिने पश्चिमेकडे तोंड करून नोजते. ही आख्यायिका या मंदिराचे वेगळेपण जपतेय. याशिवाय आणखी बऱ्याच आख्यायिका सांगितल्या जातात. ज्यामध्ये असेही म्हटले जाते की, पाच पांडव वनवासात असताना तळेगावी आले होते. तेव्हा द्रौपदी दमल्यामुळे तिने या ठिकाणी काही काळ विश्रांती घेतली होती. ते ठिकाण म्हणजेच हे मंदिर.
तर काही लोक असेही म्हणतात की, हे स्थान खुद्द पांडवांनीच द्रौपदीला विश्रांती घेता यावी म्हणून बांधले होते. (Pandava Temple) काही पौराणिक कथांमध्ये म्हटल्यानुसार, द्रौपदीने दिलेल्या एका शितावर भगवान श्रीकृष्णाचे पोट भरले आणि त्यामुळे दुर्वास ऋषींचेही काही न खाता पोट भरले असा उल्लेख आहे. ही घटना ज्या ठिकाणी घडली ते ठिकाण म्हणजे हे पाच पांडव अन द्रौपदी मंदिर.
भारतात केवळ २ मंदिरे
भारतात पाच पांडवांसह द्रौपदीचे दर्शन होईल अशी केवळ दोनच मंदिरे आहेत. त्यापैकी एक महाराष्ट्रात पुण्यातील दाभाडे येथे आहे. त्यामुळे हे उत्कृष्ट पर्यटन स्थळ मानले जाते. येथील मूळ कलाकृतींवर काही स्थलकालदर्शक किंवा इतर खुणा असू शकतात. (Pandava Temple) मात्र ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी केली जाणारी डागडुजी यामद्ये त्या झाकल्या गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. या मंदिरात जवळच एक शिलालेख आहे. तो मात्र आपले लक्ष वेधून घेईल.
कसे जाल?
पुण्यापासून ४० किलोमीटर अंतावर असलेल्या तळेगाव दाभाडेला पोहोचण्यासाठी लोहमार्ग आणि रस्ते महामार्ग असे दोन पर्याय आहेत. दोन्हीपैकी कोणत्याही मार्गाने गेलात तरी तुम्हाला चावडी चौक गाठायचा आहे. (Pandava Temple) पुण्यापासून साधारण तासाभरात या ठिकाणी पोहोचता येईल. आसपासच्या परिसरात आपल्याला राहण्याची, जेवणाची तसेच पिण्याच्या पाण्याची चांगली सोय आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही.