Pandharpur Temple : ‘दगडी बांधकाम, रेखीव कलाकुसर..’; 700 वर्षांपूर्वी असं दिसायचं पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणीचं मंदिर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pandharpur Temple) माझे माहेर पंढरी.. आहे भीवरेच्या तीरी… अशा या गोड शब्दांनी रचलेल्या अनेक भक्ती गीतामध्ये तसेच संतवाणींमध्ये उभ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचे विशेष वर्णन केले गेले आहे. या वर्णनातून दाखवलेली पंढरी खुल्या डोळ्यांनी पाहता आली असती तर डोळ्याचं पारणं फिटलं असतं, असं प्रत्येकाला वाटत. त्या काळी संतांनी ‘याची देही, याची डोळा’ पाहिलेले पंढरपूर आणि मंदिराचे रूप आता आपल्यालाही पाहता येणार आहे. ७०० वर्षांपूर्वी हे मंदिर कसे दिसत होते त्याची एक झलक आता समोर आली आहे.

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल (Pandharpur Temple)

पंढरपुरातील पुरातन विठ्ठल मंदिराचा फर्स्ट लुक नुकताच समोर आला आहे. पंढरपूरच्या या विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धन व्हावे याकरता सध्या ७३ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचे काम सुरू आहे. ज्या अंतर्गत या मंदिराला प्राचीन अन पुरातन रूप देण्यात आले आहे. अर्थात नव्याने तयार होणारे हे मंदिर आता भाविकांना ७०० वर्ष मागे घेऊन जाईल. त्यासोबत संतांनी आपल्या डोळ्याने पाहिलेली पंढरी आताच्या काळातील भाविक उघड्या डोळ्यांनी पाहू शकणार आहेत.

‘असे’ आहे बांधकाम

पंढरपुरात नव्याने तयार करण्यात आलेल्या या मंदिरा चे बांधकाम जरी नवीन असले तरी ७०० वर्ष जुन्या मंदिराचे स्वरूप साकारण्यात आले आहे. (Pandharpur Temple) त्यामुळे जुन्या काळी हे विठ्ठल मंदिर जसे होते तसे रूप देण्याचा पुरेपुर प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी प्राचीन पाषाणात असणारे नक्षीकाम, खांबावरील विविध मूर्ती, तसेच देवता, यांच्यावर असणारे नक्षीकाम आणि त्यासोबत विठ्ठलाचा चौखांबी आणि सोळखांबी मंडप पुरातन व प्राचीन रूपांत साकारण्यात आला आहे.

एकंदरच हे संपूर्ण बांधकाम अत्यंत रमणीय आणि मनमोहक झालेले दिसत आहे. गेल्या काही वर्षात या ठिकाणी रंगरंगोटी करून, अनावश्यक गोष्टी करण्यात आल्या होत्या. मात्र, आता हे मंदिर जतन आणि संवर्धनाच्या कामामुळे जसे होते तसे म्हणजेच त्याच्या मूळ रूपात साकारण्यात आले आहे. (Pandharpur Temple) दरम्यान, मंदिराचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी येत्या १५ मार्च २०२४ पासून विठ्ठल मंदिराचे पदस्पर्श दर्शन बंद केले गेले होते. तसेच दिवसातून केवळ ५ तास विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू होते. आता या विठ्ठल मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्याने येत्या २ जून २०२४ पासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार आहे.