हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आषाढी वारी ही विठुरायाच्या भक्त जणांसाठी दरवर्षी एका सणाप्रमाणे असते. दरवर्षी लाखो संख्येने वारकरी हे विठुरायाच्या चरणी जातात. अनेक लोक हे दरवर्षी चालत ही वारी पूर्ण करत असतात. या वर्षी देखील आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकऱ्यांनी विठुरायाचे दर्शन घेतले. अनेक वारकरी हे एसटीने पंढरपुरात गेले होते. वारकऱ्यांची गैरसाई होऊ नये, यासाठी एसटी महामंडळातर्फे 15 जुलै ते 21 जुलै या दरम्यान जवळपास 5000 विशेष एसटी सोडण्यात आलेल्या होत्या. या 5000 एसटीद्वारे या सहा दिवसांमध्ये 19,186 फेऱ्या झालेल्या आहेत.
या बसमधून तब्बल 9 लाख 53 हजार प्रवाशांनी प्रवास केलेला आहे. तब्बल एसटी महामंडळाला 28 कोटी 92 लाखांचे उत्पन्न झालेले आहे. त्यामुळे यंदाची आषाढी वारीने एक नवीनच विक्रम तयार केलेला आहे. या यात्रेमध्ये विठ्ठलाची तिजोरी देखील चांगलीच भरलेली आहे. म्हणजे मंदिराच्या खजिन्यात यावर्षी तब्बल 8कोटी 34 लाख रुपये जमा झालेले आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास 2 कोटी रुपये जास्त जमा झाल्याची माहिती समोर आलेली आहे. यावर्षी विक्रमी संख्येने भाविक भक्तांनी विठुरायाच्या चरणी दाखल झाले होते.
विठ्ठलाच्या भक्ताची दर्शन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी आषाढी वारीसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा विभागातून अनेक गोष्टींचे नियोजन करण्यात आलेले होते. यासाठी 5000 बसेस वारकऱ्यांसाठी पंढरपूर येथे दाखल झालेल्या होत्या. दरवर्षी यात्रेच्या दोन दिवस आधी वाखरी येथे एक मोठा रिंगण सोहळा संपन्न होतो. या वर्षी देखील या रिंगण सोहळ्यासाठी एसटी महामंडळाकडून 200 बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे एसटीने जाणारे प्रवासी आणि चालत जाणारे भाविक भक्त यामुळे जवळपास 18 ते 20 लाख भाविक भक्त पंढरपुरात दाखल झालेले होते.
यावर्षी विठूरायाची कृपा अशी झाली की, दरवर्षीपेक्षा यावर्षी समाधानकारक पाऊस देखील पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांची उरलेली कामे देखील मोठ्या संख्येने पूर्ण केलेली आहे. तसेच विठुरायाच्या तिजोरीत देखील दरवर्षीपेक्षा 2 कोटी रुपये जास्त जमा झालेले आहेत. आता ही निधी कशा स्वरूपात जमा झालेली आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
विठुरायाच्या चरणी जमा झालेला निधी
- श्रींच्या चरणाजवळ – 77,6 हजार 694 रुपये
- भक्तनिवास – 50 लाख 60, 437 रुपये
- देणगी – 3 कोटी 82 लाख 26 हजार 828 रुपये
- लाडू प्रसाद – 98 लाख 53 हजार रुपये
- पूजा – 3 लाख 99 हजार 299 रुपये
- सोने भेट – 17 लाख 88 हजार 373 रुपये
- चांदी भेट – 2 कोटी 3 लाख 65 हजार 228 रुपये
- इतर -3 लाख 64 हजार रुपये