पंढरपूरमधील विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन मिळणार फक्त 2 तासात; सुरु होणार नवी सुविधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंढरपूरचा विठूराया हा संपूर्ण जगाचा दाता आहे. आयुष्यात आणि नशिबात धरलेला प्रत्येक माणूस हा शेवटी त्याचं डोकं टेकवण्यासाठी विठुरायाच्या दरबारी येत असतो. दररोज हजारो भक्त पंढरपूरला येतात विठुरायाचे दर्शन घेतात. कारण विठुराया हा एकमेव आधार वाटतो. आपण कधीही चुकलो तरी आपल्याला योग्य वाट दाखवतो. एक वेळेस गुगल मॅपने दाखवलेला रस्ता चुकू शकतो, पण विठुरायाने दाखवलेला रस्ता कधीच चुकणार नाही. याची सगळ्यांनाच खात्री असते. म्हणूनच लाखो संख्येने भक्त हे पंढरपूरला भेट देत असतात. परंतु रोज एवढे फक्त एका वेळी पंढरपूरला गेल्याने पंढरपूरमध्ये देखील खूप गर्दी असते. आणि अनेक लोकांना हे विठुरायाचे थेट दर्शन घेता येत नाही.

परंतु आता इथून पुढे पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांना लांबच लांब रांगांमध्ये दर्शनासाठी उभा राहण्याची काही गरज नाही. कारण आता इथून पुढे केवळ दोन तासातच तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीचे थेट दर्शन घेता येणार आहे. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरच्या मंदिरात टोकन दर्शनाची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी दर्शन मंडळांनी स्काय वॉकसाठी राज्य सरकारच्या समितीने मान्यता देखील दिलेली आहे.

अशातच आता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितलेले आहे की, “आता पंढरपूरच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जास्त वेळ थांबण्याची गरज नाही. कारण भाविकांना केवळ दोन तासात हे दर्शन मिळणार आहे. आषाढी एकादशीला देखील ही खास सुविधा सुरू राहणार आहे. ही नवी सुविधा चालू करण्यासाठी सरकारने 110 कोटी रुपयांचा आराखडा देखील मंजूर केलेला आहे. आणि लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.”

त्यामुळे इथून पुढे आता पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात दर्शनासाठी गोपाळपूर पत्राशेड येथे चार मजली दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणावरून मंदिरापर्यंत 1050 मीटर लांबीचा स्काय वॉक देखील उभारला जाणार आहे. या ठिकाणावरून दर्शन घेण्यासाठी भाविकांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने टोकन घ्यावी लागणार आहे. परंतु तुम्हाला जी वेळ दिलेली आहे. त्या वेळेआधी अर्धा तास प्रतीक्षागृहात वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर पुढील दोन तासात तुम्हाला पण दर्शन घेता येणार आहे.

भाविक भक्तांसाठी ही जी चार मजली दर्शन मंडप बांधणार आहे. त्या मध्ये स्वच्छतागृह, उपहारगृह, आरोग्य व्यवस्था, विश्रांती कक्ष देखील उभारली जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने 129 कोटी रुपयांचा आराखडा देखील सादर केलेला आहे. यातील 110 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे.

भक्तांना कोणत्या सुविधा मिळणार ?

या ठिकाणी भावी भक्तांना पिण्याचे पाणी, शौचालयाची सुविधा, वेटिंग हॉल, टोकन सुविधा, रिफ्रेशमेंट, हिरकणी कक्ष, दिव्यांगांसाठी सुविधा, पोलीस, जेवणाची व्यवस्था पार्किंगची सुविधा इत्यादींचा समावेश असणार आहे.