खाऊगल्ल्ली | बऱ्याच लोकांना पनीर खूप आवडते. मात्र पनीरची तीच-तीच रेसिपी खाऊन कंटाळा असला असेल तर, पनीर भुर्जी उत्तम पर्याय ठरू शकते. पनीर भुर्जी हा पदार्थ झटपट होणार आहे. त्यामुळे घाईच्या वेळी किंवा डब्याला न्यायला पनीर भुर्जी बनवू शकता.
साहित्य –
१) पनीर १०० ग्राम
२) कांदे २
३) टोमॅटो २
४) आले- लसूण पेस्ट एक चमचा
५) तेल एक चमचा
६) लाल तिखट
७) हळद
८) मीठ
९) कोथिंबीर
कृती –
एका भांड्यात पनीर कुस्करून बारीक करून घ्यावे.
दुसरीकडे गॅसवर कढई तापत ठेवावी त्यात तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर कांदा टाकून चांगला लालसर भाजून घ्यावा. नंतर आले-लसूण पेस्ट टाकून चांगले परतून घ्या.
नंतर त्यात टोमॅटो टाकावे. टोमॅटो चांगले नरम झाल्यावर लाल तिखट, हळद आणि मीठ टाकून परतून घ्या.
या मिश्रणात कुस्करलेले पनीर टाकून चांगले एकजीव होईपरेंत परतावे. वरून कोथिंबीर टाकावी.
तयार आहे झटपट पनीर भुर्जी.
( टीप – आवडत असल्यास मटार घालू शकता. )