पाणी फाउंडेशन’च्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप २०१९’ स्पर्धेची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : अनियमित पाऊस आणि विशिष्ट भौगोलिक परिस्थिती यामुळे महाराष्ट्रातील काही भागाला कायमच दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे नागरीक व्यथित असून पावसाळा संपताच त्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पाणी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धा २०१९’ ची घोषणा अभिनेते अमिर खान आणि पत्नी किरण राव यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावरुन सदर स्पर्धेची घोषणा करण्यात आली असून दुष्काळग्रस्त भागांतील खेड्यांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘किरण आणि मला सत्यमेव जयते वॉटर कप 2019 ची घोषणा करताना अत्यानंद होत आहे. दरवर्षीप्रमाणेच पानी फाऊंडेशनची संपूर्ण टीम वॉटर कप स्पर्धेसाठी सज्ज आणि उत्सुक आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाचं प्रमाण लक्षात घेता आम्हाला पुन्हा एकदा विकेंद्रीत जलसंधारणाच्या कामाचं महत्त्व समजलं. निवडलेल्या ७६ तालुक्यांमधील गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन त्यांच्या गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा’, अशी विनंती आमीर खान यांनी सर्व गावांना केली. मागील वर्षी अभिनेते अमिर खान आणि किरण राव यांनी पाणी फाऊंडेशनच्या ची स्थापना करुन दुष्काळी भागात काम सुरु केले होते. पाणी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वाॅटर कप’ स्पर्धेला मागील वर्षी नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. ‘याहीवर्षी अनेक गावं स्पर्धेत सहभागी होतील आणि आपला गाव दुष्काळ मुक्त करण्यासाठी श्रमदान करतील’ असा विश्वास अमिर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पानी फाऊंडेशनचे संस्थापक आमीर खान, किरण राव, पानी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, नामदेव ननावरे सहभागी झाले होते. राज्यातील जल संवर्धन, कृषी आणि ग्रामीण विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे सी.ई.ओ. व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत या बैठकीत सामील झाले होते.

ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

Leave a Comment