दहा वर्षात उदयनराजेंनी जिल्ह्याचे वाटोळे केले, पंजाबराव पाटील यांचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

गेल्या दहा वर्षात खासदर उदयनराजे भोसले यांच्याकडून जिल्ह्यात कोणतेच भरीव काम झाले नाही. जिल्ह्याचा विकास ठप्प झाला असल्याने जिल्ह्याचे वाटोळे करण्याचे काम खासदार उदयनराजेंनी केल्याचा गंभीर आरोप बळीराज शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केला. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला,
पंजाबराव पाटील म्हणाले, गावगाड्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

सरकारने गेल्या पाच वर्षात शेतकर्‍याचा हिताचा कोणताच निर्णय घेतला नाही. शेतकर्‍याच्या विरोधात कायदे राबवून शेतकर्‍याचे कंबरडे मोडण्याचे काम राज्य व केंद्र सरकारने केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केली होती की, स्वामी नाथन आयोग लागू करू, शेतकर्‍यांना वेगवेगळ्या योजना देऊ. मात्र त्यांनी गेल्या पाच वर्षात जाहीर केलेल्या कोणत्याच घोषणा पूर्ण केल्या नाहीत. उलट शेतकर्‍यांना उध्वस्त करण्याचे काम त्यांनी केले.

साखर व कांदा निर्यात बंदी करून ऊसाचे व कांद्याचे भाव पाडले. शेतीमाला उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला जात नाही. यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी समक्ष झाला असून तो लाचारीने कोणाच्या पाठीमागे फिरणार नाही. या धास्तीने शेतकर्‍यांना नाजूक करण्याचे काम सरकार करत आहे. आज जिल्ह्यातील शेतकर्‍याची अवस्था गंभीर आहे. जिल्ह्यामध्ये शेतकर्‍याची 9 हजार कनेक्शन पेंडींग आहेत. बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सातारा लोकसभेची निवडणुक लढवत आहे. शेतकर्‍यांना मदत करणे हाच माझा अजेंडा असणार आहे असे पाटील यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले गेल्या दहा वर्षापासून जिल्ह्याचे नेतृत्व करत आहेत. मात्र खर्‍या अर्थाने जिल्ह्यामध्ये कोठेही विकास दिसत नाही. कराड तालुक्यातील येरवळे गाव त्यांनी दत्तक घेतले. गावामध्ये कोणतेच काम त्यांनी केले नाही. खासदार उदयनराजे यांनी भूमाता दिंडीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील पाणी जिल्ह्याला मिळाले पाहिजे तसेच जिल्ह्यातील तयार झालेली वीज ही जिल्ह्याला मिळाली पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. मात्र खासदार झाल्यानंतर याचा त्यांना विसर पडला असे म्हणत पाटील यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली.

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

उदयनराजेंविरोधात लढणार्‍या नरेन्द्र पाटीलांनी घेतली शिवेंद्रराजेंची गळाभेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

शिवेंद्रराजेंना मीच निवडूण आणणार – उदयनराजे भोसले

पुरूषोत्तम जाधवांचा शिवसेनेत प्रवेश, उदयनराजे भोसलेंच्या विरोधात लढवणार लोकसभा

स्मिता आर आर पाटील यांना सांगली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्या

उदयनराजे भोसले यांच्या विरोधात तृथीयपंथी उमेदवार रिंगणात

साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा, रोहित पवारांची आजोबांना भावनिक साद

नगरमध्ये राष्ट्रवादीकडून सुजय विखेंना प्रतिस्पर्धी कोण ?

Leave a Comment