Sunday, May 28, 2023

धनंजय मुंडे हे तोडपाणीकरणारे नेते :पंकजा मुंडे

जिंतूर |प्रतिनिधी 

लोकसभा निवडणुकीचा प्रचार जसा अंतिम टप्प्यात येवू लागला आहे तसे आरोप प्रत्यारोपाचे रण अधिकच वेगाने तापू लागले आहे. विरोधी पक्ष नेते  धनंजय मुंडे  हे तोडपाणी करणारे नेते आहेत असा घाणाघाती आरोप ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे. त्या परभणी  लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ घेतल्या गेलेल्या सभेत बोलत होत्या.

गोपीनाथराव मुंडे ज्यावेळी विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांनी सत्ताधारी पक्षाला  जेरीस आणले होते. मात्र धनंजय मुंडे हे  विरोधी  पक्ष  नेते  आहेत मात्र ते सभागृहात एकाद्या मंत्र्याच्या विरोधात चर्चा छेडतात आणि त्याविषयी तोडपाणी करतात. सेटिंग करतात असे पंकजा  मुंडे म्हणाल्या  आहेत. धनंजय मुंडे यांच्या तोडपाणी वृत्तीमुळे ते गोपीनाथ मुंडे यांचे वारस शोभत नाहीत असा वर्मी घाव घालण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे यांनी केला आहे.

पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या सोबत राष्ट्रवादी पक्षावर देखील निशाणा साधला  आहे. राष्ट्रवादी हा घरात भांडणे लावणारा पक्ष आहे. याचे मूर्तिमंत उदाहरण आमचे घर आहे.तरीही  धनंजय मुंडे यांना पवार घराण्याची चमचेगिरी करायला आवडते असे पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना म्हणले आहे.