व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भाजपकडून उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाल्या…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील भाजपच्या प्रमुख ओबीसी चेहऱ्यांपैकी एक असलेल्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे मुंडे समर्थकांकडून भाजप विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्याच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आता भाजपवर निशाणा साधला जात आहे. याबाबत पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली असून पुढील दोन दिवस अजून मी माझी भूमिका मांडणार नाही, असे म्हंटले आहे.

राज्यात राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात भाजपकडून अनेकांना उमेदवारी नाकारण्यात आल्यामुले ते नाराज आहेत. तर त्याच्या असमर्थकांकडून संतापही व्यक्त केला जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचा समावेश आहे. मुंड समर्थकांनी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजीही केली जात असल्याने याबाबत पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधत त्यांनी म्हंटले आहे की, मी पुढील दोन दिवस कोणतीही भूमिका मांडणार नाही. दोन दिवसांनंतर काय ते मी बोलेन, असे मुंडे यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, मुंडे यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून भाजपवर निशाणा साधला जात आहे. कोणाकडून तरी पंकजा मुंडे यांना जाणीवपूर्वक बाजूला सारण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर ज्या गोपीनाथ मुंडे यांनी भाजपसाठी आपले आयुष्य खर्ची केले त्यांच्या मुलीला उमेदवारी नाकारत अन्याय केला जात असल्याची टीका काही नेत्यांकडून केली जात आहे.