‘पंकजा चांगले काम करतेय’; कौतुकाच्या ट्विटवर शरद पवारांचा स्ट्रेट ड्राईव्ह, तर्कवितर्कांना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक । पुण्यात राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक मंगळवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. या बैठकीला पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि शरद पवार होते. या बैठकीत शरद पवारांच्या उपस्थितीत यशस्वी तोडगा काढत कामगारांना १४ टक्क्यांची दरवाढ देण्याचा निर्णय झाला. या बैठकीनंतर पंकजा यांनी एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी शरद पवारांना हॅट्स ऑफ म्हणत त्यांचं कौतुक केलं. पंकजांच्या या कौतुकाला शरद पवारांनी नाशिकमध्ये प्रतिसाद देत पंकजादेखील चांगले काम करत असल्याची कौतुकाची थाप मारली आहे. आधीच चर्चा त्यात पवारांनी पक्षात धनंजय मुंडे असताना केलेली स्तुती यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे.

कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले … पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे, असे ट्विट केले आणि चर्चांना उधान आले. दसरा मेळाव्यात देखील पंकजा मुंडे यांनी शरद पवारांचाही उल्लेख केला. कारण धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये आहेत. शरद पवारांशी आपले कसे जवळचे संबंध आहेत. फोन केल्यावर ते कसे प्रश्न सोडवाला मदत करतात, हे त्यांनी यानिमित्ताने सांगितले.

रोहित पवारांनीही केलं पंकजा मुंडेचे कौतुक 
पंकजा यांच्या या ट्विटवर आमदार रोहित पवार यांनी धन्यवाद ताई म्हणत त्यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांच्या दिलदारपणा आणि खिलाडूवृत्तीचं कौतुक केलं आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा.” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment