प्रवास होणार सुखकर ! पनवेल-कर्जत दरम्यान रेल्वेचा ‘सुपरफास्ट’ विस्तार! 491 कोटींचा नवा प्रकल्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Panvel Karjat Railway : मुंबईच्या बाहेर घरं घेणाऱ्यांसाठी आणि दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! पनवेल ते कर्जतदरम्यान रेल्वेचे नवे सोनेरी पर्व सुरू होणार आहे. मध्य रेल्वेने चौपदरी रेल्वेजाळ्यासाठी 491 कोटी रुपयांचा प्रकल्प आखला असून, येत्या काही महिन्यांत याचे काम वेग घेताना दिसणार आहे.

मुंबईसारख्या महागड्या शहरांबाहेर वसणाऱ्या नव्या शहरांमध्ये विशेषतः पनवेल, कर्जतसारख्या भागांमध्ये नागरिकांची वस्ती झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येची गरज ओळखून मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पनवेल ते कर्जतदरम्यान नवीन चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याचा प्रकल्प (Panvel Karjat Railway) राबवला जाणार आहे. यासाठी तब्बल 491 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

सध्या या मार्गावर एकच रेल्वे मार्गिका असून त्यावरून मेल आणि एक्स्प्रेस गाड्या धावत असतात. यामुळे प्रवाशांना वेळ-काळ यांचा सामना करावा लागतो. मात्र, नवीन चौपदरी रेल्वे रेषेमुळे प्रवास सुलभ आणि वेगवान होणार आहे.

छत्र्या काढा रे!! राज्यात 5 दिवस पावसाचा धुमाकूळ; तुमच्या भागात कसं असेल वातावरण

ही नवी 29 किलोमीटरची मार्गिका पनवेल ते चौक (कर्जत) दरम्यान असेल. याशिवाय नवीन पनवेल-कर्जत दुहेरी उपनगरी मार्ग सुद्धा वेगाने उभारण्यात येत आहे, ज्याचे 71% काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर 5 स्थानके, 9 मोठे पूल, 35 लहान पूल, आणि मोठे बोगदे बांधले जात आहेत. बोगद्याचे काम पूर्ण झाले असून डिसेंबर 2025 पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली (Panvel Karjat Railway) जात आहे.

एमयूटीपी-3 अंतर्गत या प्रकल्पात 2,782 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे आणि यासाठी केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात 800 कोटींची तरतूद केली आहे.

प्रवाशांसाठी ही अत्यंत लाभदायक बाब आहे, कारण नव्या मार्गांमुळे रेल्वे वाहतूक वेगवान, स्वच्छ, आणि विश्वसनीय होणार आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबईत उभारला जात असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ पनवेल स्थानकापासून केवळ 17 किमी अंतरावर आहे. त्यामुळे नव्या रेल्वे रेषांचा फायदा हवाई प्रवाशांनाही मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे.

एकूणच, पनवेल-कर्जत रेल्वेमार्गाचे हे विस्तारीकरण केवळ वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नाही, तर महाराष्ट्रातील भविष्यातील वाहतुकीचा कणा मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

महत्वाचे मुद्दे

  • प्रकल्पाची किंमत: ₹491 कोटी
  • पनवेल ते कर्जत नवी मार्गिका: 29 किमी
  • काम पूर्ण होण्याचा अंदाज: डिसेंबर 2025
  • प्रवाशांना हवाई आणि रेल्वे दोन्ही सुविधा सुलभ
  • एमयूटीपी-3 अंतर्गत एकूण गुंतवणूक: ₹2,782 कोटी