हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Papaya Benefits) आपला आहार जितका सकस तितका आरोग्यासाठी चांगला मानला जातो. त्यामुळे आहारात वेगवेगळ्या पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्ये यांच्यासह विविध फळांचा समावेश देखील महत्वाचा मानला जातो. अनेकदा अवेळी जेवण, अपूर्ण झोप यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो. यामुळे अख्खा दिवस छातीत जळजळ, आंबट ढेकर, डोकेदुखीने हैराण व्हायला होत. तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर उपाशी पोटी पपई खाणे फायदेशीर ठरेल. होय. सकाळी उपाशी पोटी पपई खाल्ल्यास ॲसिडिटीसारखा त्रास कुठच्या कुठे पळून जाईल तुम्हाला समजणार सुद्धा नाही. चला तर जाणून घेऊया पपई खाण्याचे इतर फायदे.
पपईतील पोषक घटक
पपई हे फळ स्वभावाने उष्ण असले तरीही अनेक आजरांच्या बाबतीत पपई अत्यंत प्रभावीपणे काम करते. पपईमध्ये पपेन नावाचे एन्झाइम असते. जे पोटाचे आरोग्य राखण्यासाठी सहाय्यक ठरते. पपेनमूळे पचनक्रिया सुरळीत राहते. शिवाय पपईमध्ये कॅरोटेनॉइड्स, अल्कालॉइड्स, मोनोटेरपेनॉइड्स आणि फ्लेव्होनॉइड्सदेखील असतात. तसेच पपई हे फळ जीवनसत्त्वे आणि खनिजांचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे पपईचे सेवन केल्यास रक्तप्रवाहदेखील सुरळीत होण्यास मदत होते. इतकेच काय तर हृदयसंबंधित आजार आणि स्ट्रोकचा धोकादेखील कमी होतो. असा हा पपई असंख्य प्रकारे फायदेशीर ठरतो. चला तर जाणून घेऊया पपईचे फायदे.
उपाशी पोटी पपई खाल्ल्यास मिळतील ‘हे’ लाभ (Papaya Benefits)
पेशींचे नुकसान टळते
पपईतील कॅफीक ॲसिड, मायरिसेटिन, व्हिटॅमिन सी, ए आणि ई सारखे अँटीऑक्सिडंट्स आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. हे अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून बचाव करतात. (Papaya Benefits) पेशींचे नुकसान करणाऱ्या घटकांबरोबर हे अँटिऑक्सिडंट्स लढतात आणि संरक्षण प्रदान करून आपले आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात.
ॲसिडिटी, छातीत जळजळपासून मिळतो आराम
जर तुम्ही ॲसिडिटीच्या त्रासाने वैतागले असाल तर रिकाम्या पोटी पपई खाणे फायदेशीर ठरते. कारण पपईमध्ये हायपर ॲसिडिटी कमी करणारे सर्व प्रभावी घटक समाविष्ट असतात. ज्यामुळे रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो.
पचन क्रिया सुधारते आणि सक्रिय होते
पपईमध्ये एन्झाइम पपेन असते. (Papaya Benefits) जे नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करतात. त्यामुळे रिकामी पोटी पपई खाल्ल्याने शरीराचे नुकसान करणारे अनावश्यक घटक शरीराबाहेर उत्सर्जित केले जातात. शिवाय पपईतील पपेन पचन क्रिया सुधारते आणि यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. इतकेच नव्हे तर बद्धकोष्ठतेचादेखील त्रास होत नाही.
वाढत्या वजनावर नियंत्रण येते
पपईमध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी पपई खाणे फायदेशीर ठरते. (Papaya Benefits) याशिवाय इन्सुलिनची मात्रासुद्धा सुधारते. परिणामी बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते आणि इतर पदार्थ खाणे टाळले जाते.
लक्षात घ्या!!
पपईचे अनेक आरोग्यदायी फायदे असले तरी तो स्वभावाने सहन होतो ही बाब विसरून चालणार नाही. विशेष करून गर्भवती महिलांनी याचे दुष्परिणाम लक्षात घेऊन पपईचे सेवन टाळावे. (Papaya Benefits)