ठाकरे सरकारच्या निलंबनाच्या कारवाई विरोधात परमबीर सिंह यांनी घेतला ‘हा’ निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, हे निलंबन बेकायदेशीर असल्याचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. तसेच त्यांनी ठाकरे सरकारे सरकारने केलेल्या निलंबनाच्या कारवाई विरोधात कोर्टातही जाणार असल्याचा इशारा दिला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे काल निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले. मात्र, परमबीर सिंह यांनी निलंबनाचे आदेश धुडकावून लावले आहेत. उलट या विरोधात ठाकरे सरकारच्या विरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. सिह यांच्यावर जेव्हा निलंबनाची कारवाई करण्यात आली तेव्हा आयएएस अधिकारी देबाशिष चक्रवर्ती यांनी परमबीर सिंग यांच्यासंबंधी दाखल केलेला अहवाल महाराष्ट्र सरकारने स्वीकारला आहे. परमबीर सिंग यांनी नागरी सेवेच्या नियमाचं उल्लंघन केल्याने देबाशिष चक्रवर्ती यांनी त्यांच्याविरोधात चौकशी केली होती. याशिवाय प्रशासकीय त्रुटींसाठी राज्याच्या गृह विभागाने त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी लावली होती.

त्यानंतर परमबीर सिंह यांच्यावर खंडणी, अधिकाऱ्यांना जातिवाचक शिवीगाळ, बुकींकडे पैसे मागितल्याचे आरोप झाल्यानंतर परमबीर सिंह यांचे निलंबन करण्यात आले. मात्र, हे निलंबन बेकायदेशीर असल्याचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. ठाकरे सरकारे सरकारने केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधातकोर्टातही जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

You might also like