परमबीर सिंह यांनी कसाबचा फोन लपवला; निवृत्त अधिकाऱ्याच्या आरोपाने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करून फरार झालेल्या माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी गंभीर आरोप केलाय. मुंबई वरील २६/११ हल्ल्यातील प्रमुख दहशतवादी अजमल कसाब याचा फोन परमबीर सिंह यांनी लपवला असा आरोप करत शमशेर पठाण यांनी खळबळ उडवून दिली आहे तसंच परमबीर सिंह यांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोपही शमशेर पठाण यांनी केलाय.

शमशेर पठाण यांनी यासंदर्भात त्यांनी यावर्षी 26 जुलैला मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. त्यात परमबीर सिंह यांनी दहशतवादी कसाबचा मोबाईल गायब करण्याचा आरोप केला आहे. याबाबत पठाण यांनी जुलै महिन्यात राज्याचे गृहमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना हे पत्र लिहिले होते. 26/11 मधील दहशतवाद्यांना परमबीर सिंह यानी मदत केल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे.

डीबी मार्ग पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पीआय माळी यांनी आपल्याला कसाबकडून एक फोन सापडल्याने सांगितले होते. पण गिरगाव चौपाटीच्या ज्या सिग्नलवर कसाबला पकडले होते. त्या ठिकाणी परमबीर सिंह आले होते. त्यांनी तो फोन त्यांच्याकडे ठेवून घेतला. पण त्यांनी फोन तपास अधिकारी रमेश महाले यांना द्यायला हवा होता. याच मोबाइलवरुन कसाबसह इतर दहशतवादी पाकिस्तानमधील हँडलरशी संवाद साधत होता. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी पठाण यांनी केली आहे.

You might also like