Paramotoring Mahabaleshwar : थंड हवेचे ठिकाण आणि स्ट्रॉबेरीचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरला तुम्ही नक्की जात असाल. मात्र आता महाबळेश्वर मध्ये तुम्हाला इतर पर्यटनव्यतिरिक्त साहसी खेळाचा अनुभव घेता येणार आहे. त्यामुळे तुमच्या महाबळेश्वर ट्रिप ला चार चाँद लागतील यात शंका नाही. तर आता महाबळेश्वर मध्ये तुम्ही पॅरामोटरिंग (Paramotoring Mahabaleshwar ) सारख्य साहसी खेळाचा अनुभव घेऊ शकणार आहात.
महाबळेश्वर हे सुंदर ठिकणांसाठी ओळखले जाते. विकेंड ला आपल्या कुटुंबासोबत जाण्यासाठी महाराष्ट्रातील हे आवडते ठिकाण आहे. त्यात आता या साहसी खेळ असणाऱ्या परमॉटरिंगचा (Paramotoring Mahabaleshwar ) अनुभव घेता येणार आहे. याआधी जर पॅरामोटरींग चा अनुभव घ्यायचा असेल तर महाराष्ट्राबाहेरच्या प्रसिद्ध ठिकाणी जावे लागायचे मात्र आता तुम्हाला इकडे तिकडे झऱ्यांची गरज नाही.
महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाने हे खास फोटो शेअर केलेत.आकाशात उंच उंच उडा! ही संधी गमावू नका. महाबळेश्वरमध्ये पॅरामोटरिंगचा थरार अनुभवा, असं आवाहन पर्यटन विभागाकडून (Paramotoring Mahabaleshwar ) करण्यात आलं आहे.
सर्वात थरारक साहस करायला तयार असाल तर तुम्ही आपल्या महाबळेश्वरमध्ये (Paramotoring Mahabaleshwar ) जाऊ शकता. आतापर्यंत थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणार आपलं महाबळेश्वर आता पॅरामोटरिंग स्पॉट म्हणून ओळखलं जात आहे.