परभणी जिल्हा बँक निवडणुक; आ. दुर्राणी ‘या’ कारणामुळे गेले बोर्डीकर गटात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

हिंगोली व परभणी जिल्ह्यात बहुसंख्येने व शेतीशी निगडीत असणाऱ्या दोन समाजाला परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्यात वरपुडकर गटाने डावलल्याने मी बोर्डीकर गटात सामील झालो असल्याचा खुलासा स्वतः आ .बाबाजानी दुर्राणी यांनी एका पत्रकार परिषदमध्ये केला. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये अचानक आई तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनल अर्थात बोर्डीकर गटात आ .बाबाजानी दुर्राणी सामील झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या .तर राजकारण्यांसाठी हा आश्चर्याचा धक्का होता .

यासंदर्भात जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चेला उधान आले असताना .गुरुवार १८मार्च रोजी दुपारी १२ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी येथे पत्रकार परिषद घेत यावेळी घेतलेल्या भुमिकेचा खुलासा केला . यावेळी बोलताना आ .दुर्राणी म्हणाले की ,परभणी व हिंगोली जिल्ह्यात मिळून बहुसंख्य प्रमाणामध्ये धनगर , हटकर व माळी समाजाचे लोक राहतात १९८९ पासून ते आजपर्यंत वरपूडकर व बोर्डीकर यांच्या ताब्यात असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँके मध्ये या दोन्ही समाजांना प्रतिनिधित्व देण्यात आले होते . आ .वरपूडकर यांनी यावेळी मात्र या समाजाच्या उमेदवारांना उमेदवारी देताना डावलले .उलट बोर्डीकर यांनी दत्ता मांयदळे व प्रल्हाद चिंचाणे यांच्या रूपाने या दोन्ही समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे .

महाविकासआघाडी सोडून आई तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनल मध्ये सहभागी होण्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर आ . दुर्राणी म्हणाले की,ही पक्षाची निवडणूक नसून सहकार क्षेत्रातील निवडणूक आहे .त्यामुळे या ठिकाणी पक्षाचा काही संबंध येत नाही . असे म्हणत आपली भूमिका योग्य असल्या बाबत समर्थन केले .

पुढे बोलताना आ .दुर्राणी म्हणाले की ,जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक असूनही त्यांना वेळेवर पतपुरवठा होत नाही. अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला बाराशे कोटी पेक्षा जास्त ठेवी असल्याने व तीनशे कोटी रुपयांची कर्जमाफी आल्यानंतर बँक सुस्थितीत आहे .शेतकऱ्यांना तीन लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळणार असल्याने चांगले काम करण्याची संधी आई तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून मिळणार असून या पॅनलला मतदान करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment