चालू आर्थिक वर्षातील अनूदानाशी निगडीत देयके २७ मार्चपर्यंतच स्विकारण्यात येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
राज्यामध्ये ‘कोरोना’ विषाणूच्या संक्रमनाने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ५ टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. त्यामुळे  कोषागार कामकाजाचे नियमन करण्याच्या दृष्टीने वित्त विभागाच्या दि. २४ मार्चच्या आदेशा नुसार जिल्हा कोषागार तसेच उपकोषागार कार्यालयात चालू आर्थिक वर्षातील अनूदानाशी निगडीत देयके दि. २७ मार्च पर्यंतच स्विकारण्यात येणार आहेत.

त्यानंतर ‘कोरोना’ आजाराशी निगडीत देयके वगळता कोणत्याही प्रकारची देयके जिल्हा कोषागार, उपकोषागारात स्वीकारली जाणार नाही. याची नोंद सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी घ्यावी. असे जिल्हा कोषागार अधिकारी सुनिल वायकर यांनी कळविले आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment