आंदोलन :परभणीचे शेतकरी पुण्याच्या साखर संकुलावर येऊन धडकणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी |गजानन घुंबरे

परभणी जिल्हात भीषण दुष्काळ आसताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी थेंबथेंब पाणी देत पिकवलेला ऊस अवेळी कारखानदारांच्या घशात घातला. त्यात गंगाखेड शुगर सारख्या कारखान्यांनी मागील तीन -चार महिन्यापासून ऊस बील अदा केले नाहीयेत, शेतक-यांच्या घरि कित्येक मुलीचे लग्न, आजारपण,मुलाच्या लग्नआधी घराचे स्वप्न तर काही जनांच्या शैक्षणीक, व्यवसायीक अपेक्षा या ऊसाच्या पैशावर आहेत. आज चार महीणे उलटुन ही हे कारखानदार शेतकर्‍यांच्या घामाचे दाम देत नाहीत.
१४ दिवसाच्या आत शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याचा कायदा असताना कारखानदार कायदा पायखाली घेण्याचे काम करत आहेत. आणि प्रशासन मुग गिळुन गप्प बसले आहे अशा तीव्र भावना व्यक्त करीत जिल्हातील शेतकरी यांनी पुणे येथील साखर आयुक्तांच्या कार्यालयावर 5 मे ला आंदोलन करण्याचे गंगाखेड येथे घेण्यात आलेल्या ऊस उत्पादकांच्या बैठकीत ठरवले आहे . दरम्यान ऊसाचे बील एफआरपी कायद्यानुसार व्याजासहीत घेण्याचा निर्धार यावेळी उपस्थित शेतकरी यांनी केलाय .
या बैठकीला शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली कदम,धारासुर जिल्हापरीषद सर्कलचे सदस्य डॉ शुभाष कदम, मराठवाडा अध्यक्ष शेतकरी संघटक बंडु सोळंके, जेष्ठ नेते शेतकरी संघटक अंनतराव कदम,माऊली जोगदंड,युवा आघाडी जिल्हाध्यक्ष आण्णा जोगदंड, गंगाखेड तालुकाध्यक्ष कृष्णा भोसले सोबत जिल्हातील ऊसउत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Leave a Comment