परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
चार वर्षापूर्वी सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याच्या घटनेने जिल्हात खळबळ उडाली होती . मंगळवारी या प्रकरणी निर्णय देत, नराधम आरोपी विष्णू गोरे यास गंगाखेड जिल्हा व सत्र न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे .
२०१६ साली घडलेल्या या प्रकरणाची सविस्तर अशी कि, या घटनेतील पीडित मुलीचे आजोबा यांनी २९ आक्टोबर २०१६ रोजी सोनपेठ पोलीस स्टेशन येथे दि. २७ आक्टोबर२०१७ रोजी सकाळी ९ ते ४ वाजेच्या दरम्यान पासून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या नातीचे अपहरण केल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर सोनपेठ पोलीस ठाण्यात कलम ३६३, ३६६ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला असता, तपासामध्ये दोन दिवसांनी पोलिसांना, फिर्यादीच्या नातीचे प्रेत पोत्यात बांधून विश्वंभर लोंढे यांच्या शेतातील विहिरी मध्ये आढळून आले होते. सदर प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास करून भादवि कलम ३०२ व वैद्यकीय अहवालानुसार ३७६ व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ व ६ नुसार दोषारोप दाखल करण्यात आले होते.
दरम्यान पोलीसांना आरोपी सापडला असता आरोपी विष्णू मदन गोरे याने पीडितस अतिशय क्रूरपणे अत्याचार करत खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणी दोषारोप पत्र दाखल करून आरोपीस ताब्यात घेतले होते. या प्रकरणात न्यायालयात एकूण २३ साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये मुख्यतः फिर्यादी साक्षीदार व वैद्यकीय अहवाल, प्रत्यक्ष घटनास्थळ साक्षीदार आणि पोलिस तपास करणारे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या यावरून न्यायालयाने वेगवेगळ्या कालमानाप्रमाणे आरोपी विरोधात गुन्हा सिद्ध झाला त्यावर काल गंगाखेड सत्र न्यायालयात आरोपीस भा.दं.वि ३०२ नुसार अशा प्रकरणात घटनेचे गांभिर्य लक्षात घेत , साक्षीपुरावानुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. इनामदार यांनी आरोपीस मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे वकिल एस. डी. वाकोडकर यांनी कामकाज पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील डी. यु. दराडे व एस. बी.पोळ यांनी सहकार्य केले. या प्रकरणात तत्कालीन सरकारी वकील ऍड.एस.पी.चौधरी व वकिल भगवान यादव यांनी सहकार्य केले.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.