परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
राज्यातील सत्तेमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वीरित्या राबविल्यानंतर, परभणी जिल्हा परिषदेमध्ये ही घटक पक्षांनी सत्ता ताब्यात घेत, काही दिवसांपूर्वी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीने काँग्रेसने बिनविरोध मिळवले. त्यानंतर आता शुक्रवार दि. ३१ जानेवारी रोजी झालेल्या विषय समितीच्या सभापतीपद निवडीतही महाविकास आघाडीने ताबा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेचे बांधकाम, अर्थ आणि पशुसंवर्धन असे तीन सभापती पदे मिळवली. तर घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला महिला आणि बालविकास सभापती पद देण्यात आल आहे.
विशेष म्हणजे मागच्या वेळी सत्तेमध्ये असलेल्या भाजपला, यावेळी सभापती निवडीमध्ये दूर ठेवत, शिवसेनेने शिक्षण सभापती पद मिळवल आहे. यावेळी रामराव उबाळे ( रा. काँग्रेस )समाज कल्याण, शोभाबाई घाटगे ( काँग्रेस )महिला व बालकल्याण, मिराबाई टेंगसे ( रा . काँग्रेस )कृषी व पशु संवर्धन, अंजलीताई आणेराव ( शिवसेना) शिक्षण व आरोग्य, अजय चौधरी (रा . काँग्रेस )बांधकाम व अर्थ, यांची सभापतीपदी वर्णी लागली असुन राज्यातील सत्तेचा फार्मूला परभणी जिल्हापरिषदेतही यशस्वीरीत्या राबवण्यात आला आहे.