परभणीमधील सेलूत सूर्यनमस्कार शिबिर संपन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून, आज परभणी जिल्ह्यातील सेलू येथे, सूर्यनमस्कार शिबिर आयोजित करण्यात आले. सेलू शहरातील श्रीराम कॉलनी मैदानावर शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. सेलू गटशिक्षणाधिकारी आणि शहरातील विविध शाळांच्या संयुक्त विद्यमाने, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य प्रती जनजागृती व्हावी आणि त्यांना सूर्यनमस्काराची गोडी लागावी. यासाठी सेलू शहरातील शाळांच्या विद्यार्थ्यांना, या ठिकाणी एकत्रित करून, त्यांना सूर्यनमस्काराचे धडे देण्यात आले. यावेळी गटशिक्षण अधिकारी सेलू आणि शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावली.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

पूण्यात ‘महाटेक २०२०’ प्रदर्शनाची ६ फेब्रुवारीपासून सुरुवात

परभणी जि.प.च्या विषय समिती सभापतीपदावरही महाविकास आघाडीचा ताबा

कुणाल कामराची इंडिगो एअरलाईन्सला नोटीस; २५ लाख भरपाई आणि बंदी हटविण्याची मागणी

Leave a Comment