परभणी प्रतीनिधी । गजानन घुंबरे
परभणी जिल्ह्यात आज सकाळी व सायंकाळी आलेल्या स्वॅब तपासणी अहवालापैकी सात जणांना कोरोना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना मुक्त असलेल्या तालुक्या पैकी मानवत तालुक्यात ही त्याचा शिरकाव झाल्याने चिंतेत भर पडली आहे.
शुक्रवारी सकाळी जिल्ह्यातील पाठवण्यात आलेल्या ३७ अहवाला पैकी जिंतूर तालुक्यातील वाघी बोबडे या गावातील वृद्ध महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता .आज सायंकाळी ८७ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून ,त्यामध्ये पूर्णा तालुक्यात २ ,गंगाखेड तालुक्यात १, सेलू तालुक्यात एक मध्ये २ तर आतापर्यंत कोरोना संसर्गा पासून सुरक्षित असलेल्या तालुक्यांपैकी असणाऱ्या मानवत तालुक्यातही ही कोरोणा रुग्ण सापडल्याने जिल्हावाशीयांचे टेंशन वाढले आहे.
दरम्यान परभणी जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आज आलेल्या पॉझिटिव्ह अहवालानंतर ७४ वर गेली आहे. असे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये सांगण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.