परभणी जिल्ह्यात ‘आघाडी – युती’ मध्ये ‘कडवी झुंज’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । जिल्ह्यामध्ये चारही मतदारसंघांमध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. या सोबतच हलक्या पावसालाही सुरुवात झाली आहे. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत परभणी विधानसभा मतदार संघ वगळता गंगाखेड, जिंतूर आणि पाथरी विधानसभा मतदारसंघातील कल समोर आले आहेत. यामध्ये आघाडी व पिछाडीवर असणाऱ्या उमेदवारांमध्ये गंगाखेड मधून रासपचे रत्नाकर गुट्टे आघाडीवर आहेत. तर या ठिकाणी शिवसेनेचे विशाल कदम पिछाडीवर पडलेले आहेत. तर पाथरी मधून भाजपाचे मोहन फड आघाडीवर असून काँग्रेसचे सुरेश वरपूडकर दोन हजार मतांनी पिछाडीवर पडलेलं आहेत. सध्या या ठिकाणी दोघांमध्ये काट्याची लढत होत आहे. एका एका मतासाठी कार्यकर्त्यांची चांगलीच धाकधूक वाढत आहे.

दरम्यान जिंतूर मधून ‘भाजपा’च्या मेघना बोर्डीकर आघाडीवर असून राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे पिछाडीवर पडले आहेत. सध्या या ठिकाणी दोघांमध्ये तुल्यबळ लढत होत आहे असे निकालावरून दिसत आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून सर्वच मतदारसंघांमध्ये पोस्टल मतदान मोजणी सुरू झाली. सकाळ पासूनच पावसाचेही आगमन झाले आहे. त्यामुळे मतदान मोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांच्यामध्ये चांगलीच शांतात आहे. तर आता या परिसरामध्ये हळूहळू कार्यकर्ते येताना दिसत आहेत. दरम्यान आकडेवारी मिळालेल्या तीनही मतदारसंघांमध्ये अपक्ष , वंचित बहुजन आघाडी विशेष प्रभाव दाखवत नसल्याचे दिसून येत आहे. अपवादात्मक फक्त गंगाखेड मध्ये रासप आघाडीवर आहे.