शेतीला जोडधंदा निर्माण करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभाग मदत करणार- सभापती मिराताई टेंगसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

परभणी जिल्ह्यातील पशुपालन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या पंतप्रधान किसान निधीची रक्कम जमा होणाऱ्या बँकेतून पी.एम.किसान कार्ड काढल्यावर जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून शेतीपुरक पशुपालनांचा जोडधंदा करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल अशी ग्वाही जि.प.पशुसंवर्धन सभापती मिराताई टेंगसे यांनी दिली आहे. त्या हॅलो महाराष्ट्रशी बोलत होत्या.

केंद्र सरकारद्वारे देण्यात येणाऱ्या पंतप्रधान किसान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना किसान कार्ड मिळणार आहे . त्यातून सर्वात कमी 7% व्याजदराने 2 लक्ष रु.पर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे. सदरील कर्ज वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजात 4% टक्के सूटही मिळणार आहे. या योजनेमुळे पशुपालन,दुग्धव्यवसाय,शेळीपालन,मेंढीपालन,कुक्कूुटपालन आणि वराहपालन करून शेतीला जोडधंदा निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी पी.एम.किसान कार्ड ची नोंदणी करून बँकेद्वारे प्रस्ताव दाखल करावेत व ज्या शेतकरी बांधवांना बँका सहकार्य करणार नाहीत त्या सर्व शेतकरी बांधवांनी या प्रस्तावासह माझ्याशी संपर्क करावा, असे आवाहन सभापती मिराताई टेंगसे यांनी केले आहे. अधिकाअधिक पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत शेतीला जोडधंदा निर्माण करावा अशीही अपेक्षा मिराताई टेंगसे यांनी व्यक्त केली.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment