पाथरीत विविध विषयांवरील महिलांची मराठवाडा विभागीय विचारमंथन कार्यशाळा संपन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

महिलाराज सत्ता आंदोलनाच्या माध्यमातून राजकिय क्षेत्रात महिलांचे सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, भ्रष्टाचार मुक्त, गावपातळीवरील निवडणुक या विषयावर विचारमंथन करण्यासाठी पाथरी येथे नुकतेच दोन दिवसीय विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

महिलांचा सर्वांगीन विकास व्हावा यासाठी मागील अनेक दिवसांपासुन महिलाराजत्ता आंदोलनाच्या माध्यमातुन प्रयत्न करण्यात येत आहे. यापुर्वी महिलांना आधुनिक तंत्रज्ञान यांची माहिती मिळावी यासाठी डिजीटल कार्यशाळा तर गावमाहिती केंद्राची स्थापना करण्यात आल्या आहेत. महिलांचा राजकिय क्षेत्रात सक्रिय सहभाग वाढवा व लोकशाहितील उत्सव असणाऱ्या निवडणुक प्रक्रिया, रणनिती ठरवणे, महिलांचे सक्षम गट तयार करने, भ्रष्टाचार मुक्त मतदान, व्यसनमुक्त अशी गावपातळीवरिल निवडणुक व्हावी या विषयावर महिलांचे विचारमंथन करणारी विभागीय कार्यशाळा दि. २३ व २४ फेब्रुवारी रोजी पाथरीत घेण्यात आली.

सदरील कार्यशाळेस राज्य निमंत्रक मालती सगणे यांनी मार्गदर्शन केले.कार्यशाळचे उद्घाटन पंचायत समिती सभापती कल्पना थोरात यांचे हस्ते करण्यात आले होते. या कार्यशाळेला मराठवाड्यातील महीला सरपंच, पंचायत सखी यांच्यासह गावशाखा प्रमुख अशा तीस प्रतिनिधीची उपस्थिती होती.कार्यशाळा यशस्वीतेसाठी जनवादी प्रतिष्ठानच्या नंदाताई गायकवाड, बालासाहेब गायकवाड, पंचफुला वडदे, ललिता व्हटे, निलावती चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment