व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारधी समाज बांधवांचे बोंबाबोंब आंदोलन

सातारा प्रितिनिधी । शुभम बोडके

एका चार वर्षीय चिमुरडी अत्याचार झाल्याची घना घडल्याने या विरोधात पारधी समाजबांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान समाज बांधवांच्या वतीने आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी संबंधित आरोपीला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यासाठी समाजबांधवांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना भेटण्याची विनंती केली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांची भेट नाकारण्यात आल्याने पारधी समाज बांधवानी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध केला.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडल्यानंतर या विरोधात पारधी समाजबांधवानी महिलांसह जिहाधिकारी शेखर सिह यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने पारधी बांधवांनी उपस्थिती लावली. यावेळी प्रशासनाने मागण्याची दखल घेत संबंधित अत्याचार करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

 

या संदर्भात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असल्याचे बांधवानी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी पोलिसांच्या वतीने संबंधित पारधी बांधवांशी चर्चा करीत त्यांची समजूत घालण्याचा व समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आक्रमक झालेल्या अंदाज बांधवांनी पुन्हा जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणाव निर्माण झाला आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आमदारांना भेटण्यास वेळ आहे मात्र आम्हा गरिबांना न्याय देण्यास साहेबांना वेळ नाही, असे म्हणत पारधी समाज बांधवानी आक्रमक पावित्रा घेतला आहे.

आरपीआयच्या वतीनेही आंदोलनास पाठींबा

आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर पारधी समाज बांधवांनी अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन केले. यावेळी आंदोलनास आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनीही पाठींबा दर्शवला. यावेळी आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी अत्याचार करणाऱ्या संबंधित आरोपीला कठोर शिक्षा करावी, यासह विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनास निवेदन दिले.