सुप्रिया सुळे यांच्यासहित महाराष्ट्रातील 4 खासदारांना संसदरत्न पुरस्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे याना पुन्हा एकदा संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहेत. सुप्रिया सुळेंनी सलग ७ व्या वर्षी मानाचा पुरस्कार पटकावला आहे. चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई-मॅगझिनतर्फे संसदेतील खासदारांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो.

महत्वाचे म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील चार खासदारांचा यात समावेश आहे.  शिवसेनेचे श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीच्या फौजिया खान, भाजपच्या हीना गावित. कामगिरीतल्या सातत्याबद्दल सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे यांना “संसद विशिष्ट रत्न’ पुरस्कार असणार आहे.

खासदार सुप्रिया सुळे या संसदेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत असून चालू यावर्षीही लोकसभेतही त्यांची कामगिरी सर्वोत्तम अशीच राहिली आहे. त्यांनी चालू लोकसभेच्या कामकाजात १ जून २०१९ ते ११ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ९२ टक्के उपस्थिती लावत १६३ चर्चांमध्ये सहभाग घेतला. तब्बल ४०२ प्रश्न त्यांनी उपस्थित केले, इतकेच नाही, तर ८ खासगी विधेयकेही त्यांनी संसदेत सादर केली आहेत.