VIdeo अबब ! सातारा- सोलापूर मार्गावर 44 प्रवाशी वाहतूक करणारी बस जळून खाक

दहिवडी | सातारा – सोलापूर मार्गावरील बस अचानक पेटली. या बसमध्ये चक्क 44 प्रवाशी होते. म्हसवड जवळ सागर ढाब्याजवळ बस आगीच्या भक्ष्यस्थानी जळून खाक झाली आहे. चालकांच्या प्रसंगावधानाने सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. मात्र, बसमधील प्रवाशांच्यात भीतीचे वातावरण होते. म्हसवड नगरपालिकेची अग्निशामक दलाने आग विझविण्यात यश मिळविले आहे.

 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा येथून सोलापूरकडे निघालेली बस क्रमांक (MH-11-BL-9355) म्हसवड येथून काही अतंरावर सागर ढाब्याजवळ धुळदेव येथे गेल्यानंतर एक प्रवाशी उतरला. यावेळी बाॅनेटमधून धूर निघू लागल्याने चालक खाली उतरले. तेव्हा गाडीने पेट घेतल्याचे चालकांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी प्रवाशांना गाडीतून खाली उतरण्यास सांगितले. तेव्हा काहीजण खिडकीतून उतरले, तर काहीजणांनी बसमधून खाली उडी मारली.

एसटी बसने काही वेळातच संपूर्ण पेट घेतला. या आगीच्या भक्ष्यस्थानी बस जळून खाक झाली. सदरील घटना 2 वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी म्हसवड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र बस संपूर्ण जळून खाक झाली. त्यामुळे बसचे मोठे अर्थिक नुकसान झाले.