जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनावर ओळखीसाठी स्टीकर लावा- परभणी जिल्हाधिकारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे सुरु राहावा यासाठी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक व वितरण सुट देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी अडचण होऊ नये यासाठी संबंधित आस्थापनाने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात येईल. अशा वाहनावर ‘जीवनावश्यक वस्तूसाठीचे वाहन’ अशा आशयाचे मोठे स्टीकर वाहनाच्या दर्शनी बाजूवर लावण्यात यावेत. असे आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत विविध राज्यात कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात दि. २३ मार्च २०२० पासून पूर्ण लॉकडाऊन घोषित केलेले असले तरी जीवनावश्यक वस्तुंना यातून सूट देण्यात आली असल्याने अशी वाहतूक सुरू असून ही वाहतूक करणा-या कर्मचा-याला संबंधित आस्थापनेने ओळखपत्र द्यावे. तसेच पोलिसांनी विचारणा केली असता हे ओळखपत्र दाखविण्यात यावे. असेही जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment