हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांगलादेश विरुद्व सुपर ८ मधील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सने हॅट्रिक (Pat Cummins Hat Trick) घेतली आहे. पॅट कमिन्सने डावाच्या १८ व्या षटकात २ बळी आणि २० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूंवर १ बळी घेत हॅट्रिक साजरी केली. टी-20 विश्वचषक 2024 मध्ये पहिली हॅट्ट्रिक घेण्याचा भीमपराक्रम कमिन्सने करून दाखवला. तसेच T20 विश्वचषकाच्या इतिहासात हॅट्ट्रिक विकेट घेणारा कमिन्स हा दुसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी ब्रेट लीने 2007 मध्ये हॅट्रिक घेण्याची कामगिरी करून दाखवली होती.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीपासूनच कांगारूंनी बांगलादेशवर अंकुश ठेवला होता, टिच्चून गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला अवघ्या १४० धावांत रोखले. ऑस्ट्रेलिया कडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याने डावाच्या १८ व्या षटकाच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर महमदुल्ला आणि मेहंदी हसन याना बाद केलं. त्यानंतर २० व्या षटकात कमिन्स पुन्हा गोलंदाजीला आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर रिदोयला माघारी धाडलं आणि विश्वचषकातील आपली पहिली हॅट्रिक (Pat Cummins Hat Trick) साजरी केली.
T20 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणार गोलंदाज– Pat Cummins Hat Trick
ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध बांगलादेश, केप टाउन, 2007
कर्टिस कॅम्फर (आयर्लंड ) विरुद्ध नेदरलँड्स, अबू धाबी, 2021
वानिंदू हसरंगा (श्रीलंका) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजाह, 2021
कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध इंग्लंड, शारजाह, २०२१
कार्तिक मयप्पन (UAE) विरुद्ध श्रीलंका, गिलॉन्ग, 2022
जोशुआ लिटल (आयर) विरुद्ध न्यूझीलंड, ॲडलेड, 2022
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध बांगलादेश, अँटिग्वा, 2024