Pat Cummins चा धडाका!! World Cup मध्ये सलग दुसरी हॅट्रिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सने क्रिकेट इतिहासात नवा विक्रम रचलाय…. . अफगाणिस्तानच्या सुपर ८ सामन्यात पॅट कमिन्सने हॅट्रिक साजरी केली. विशेष म्हणजे मागील सामन्यात बांगलादेश विरुद्व त्याला हॅट्रिक मिळाली होती. म्हणजेच सलग २ सामन्यात पॅट कमिन्सने २ वेळा हॅट्रिक केली आहे. वर्ल्ड कप मध्ये सलग २ सामन्यात २ वेळा हॅट्रिक घेणारा पॅट कमिन्स पहिला आणि एकमेव गोलंदाज ठरला आहे.

आजच्या अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रहमतुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी ११५ धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर अफगाणिस्तानचा डाव गडगडला.. पॅट कमिन्सने १७. ६ षटकात राशिद खानला आऊट केलं. त्यानंतर पुढच्या ओव्हर मधील पहिल्या चेंडूवर करीम जनत आणि गुलबद्दीन नैब याना बाद करत सलग दुसऱ्या सामन्यात हॅट्रिक घेतली. बांगलादेश विरुद्ध सुद्धा कमिन्सने २ ओव्हर मध्ये हॅट्रिक घेतली होती. बांगलादेश विरुद्ध त्याने डावाच्या १८ व्या षटकाच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर महमदुल्ला आणि मेहंदी हसन याना बाद केलं. त्यानंतर २० व्या षटकात कमिन्स पुन्हा गोलंदाजीला आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर रिदोयला माघारी धाडलं आणि विश्वचषकातील आपली पहिली हॅट्रिक (Pat Cummins Hat Trick) साजरी केली होती.

T20 World Cup मध्ये हॅट्रिक घेणारे गोलंदाज

ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध बांगलादेश, केप टाउन, 2007
कर्टिस कॅम्फर (आयर्लंड ) विरुद्ध नेदरलँड्स, अबू धाबी, 2021
वानिंदू हसरंगा (श्रीलंका) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजाह, 2021
कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध इंग्लंड, शारजाह, २०२१
कार्तिक मयप्पन (UAE) विरुद्ध श्रीलंका, गिलॉन्ग, 2022
जोशुआ लिटल (आयर) विरुद्ध न्यूझीलंड, ॲडलेड, 2022
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध बांगलादेश, अँटिग्वा, 2024