जिंकलंस भावा ! कोरोना संकटात ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची भारताला मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान तरीही देशात आयपीएल स्पर्धा सुरू असून कोरोनामुळे क्रिकेटपटू आयपीएल अर्ध्यातून सोडून जात आहेत. परंतु ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स ने मात्र कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला 50 हजार डॉलरची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कमिन्सने याबाबतचं ट्वीट केलं आहे.

भारतामध्ये मी गेली अनेक वर्ष येत आहे आणि इथल्या लोकांनी मला खूप प्रेम दिलं. आयपीएलमुळे आम्हाला कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचता येतं, याचाच विचार करून मी पीएम केयर फंडाला आर्थिक मदत करायचं ठरवलं आहे. यामुळे भारताला गरज असलेले ऑक्सिजन सिलेंडर विकत घेता येतील. याचसोबत मी माझे सहकारी खेळाडू आणि इतरांनाही विनंती करतो की ज्यांना भारताकडून प्रेम मिळालं आहे, त्यांनीही मदत करावी. मी 50 हजार डॉलरची मदत करत आहे.’

‘अशा कठीण परिस्थितीमध्ये अनेकांना असहाय्य वाटू शकतं. मलाही नजिकच्या काळात असं वाटलं. पण हे आवाहन केल्यामुळे आपण आपल्या भावना कार्यात उतरवू शकतो आणि अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पाडू शकतो. माझी मदत ही फार मोठी नाही, पण यामुळे कोणाच्यातरी आयुष्यात नक्कीच फरक पडेल,’ असं पॅट कमिन्स म्हणाला आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment