पाटण अर्बन बॅंकेने ग्राहकांचे हित कायम जपले : माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर

0
71
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण | पाटण अर्बन बँकेने सुरू केलेले एटीएम हे ग्राहकांच्या निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. एटीएमच्या माध्यमातून ग्राहकांना तात्काळ पैसे मिळणार असल्याने त्यांचा वेळ वाचणार आहे. ग्राहकांचे हित जपण्याची बँकेने परंपरा कायम ठेवली असून सभासद व ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केले.

दि पाटण अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या एटीएम सेवेचा शुभारंभ माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. युवानेते सत्यजितसिंह पाटणकर, पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती रेखाताई पाटील, राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुभाषराव पवार, जिल्हा परिषद सदस्य बापूराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

सत्यजितसिंह म्हणाले, विक्रमसिंह पाटणकर पाटणकर यांच्या संकल्पनेतून ग्राहकांच्यासाठी एटीएम सुविधा मूर्त स्वरूपात साकार झाली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना फायदा होणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी माधव कपिलेश्वर यांनी एटीएमसंदर्भातील माहिती दिली. बँकेचे चेअरमन दिनकरराव घाडगे यांनी स्वागत केले. व्हाईस चेअरमन शिवाजीराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले. संतोष विचारे यांनी सूत्रसंचालन केले. व्यवस्थापक के. आर. शिंदे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here