पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्दमध्ये भाजपचा धुव्वा ; सुधाकर वांढेकरांचा दणदणीत विजय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर । गेल्या 2-3 दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. सकाळपासूनचं मतमोजणीला सुरवात झाली होती. पाथर्डी तहसीलमध्येही तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यात पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्दमध्ये राष्ट्रवादीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. येथील राष्ट्रवादीचे सुधाकर वांढेकर यांनी भाजपला धूळ चारत विजय मिळवला.

वांढेकर हे सर्वाधिक माताधिक्याने विजयी झाले आहेत. सुधाकर वांढेकर यांनी 6-3 असा विजय मिळवला आहे. त्यामुळे गावात एकच जल्लोष सुरू आहे. सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाल्याने गावकऱ्यांनी जेसीबीने गुलाल उधळून त्यांचं स्वागत केलं आहे.

गावातील अपूर्ण कामे रखडलेला विकास, पाणी प्रश्न या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन गावाचा विकास करणार असल्याच मत सुधाकर वांढेकर यांनी व्यक्त करत मतदारांचे आभार मानले आहेत.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment