धक्कादायक ! रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्णाची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अंबाजोगाई : हॅलो महाराष्ट्र – अंबाजोगाईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. यानांतर या व्यक्तीने रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील शौचालयातील खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास हि घटना घडली आहे.

आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव प्रकाश उत्तम राठोड असे आहे. प्रकाश याने कर्जबाजारी पणाला कंटाळून शनिवारी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर नातेवाईकांनी त्याला स्वाराती रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्याच्यावर उपचार सुरु होते. यानंतर प्रकाशने सोमवारी पहाटे १ वाजताच्या सुमारास बांधलेले हात कसेबसे सोडले आणि हाताचे सलाईन काढून टाकून अतिदक्षता विभागाच्या बाहेर आला.

यानंतर तो डायलीसीस विभागातील शौचालयात गेला. त्यानंतर त्याने शौचालयाच्या खिडकीचे गज काढून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने खाली उडी मारली. यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. यानंतर त्याला तातडीने अपघात विभागात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी त्याचा पहाटे ३ वाजता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यानंतर प्रकाशच्या पत्नीने दिलेल्या जबाबावरून अंबाजोगाई शहर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Leave a Comment