Monday, February 6, 2023

रूग्णसंख्या स्थिरच : सातारा जिल्ह्यात नवे 856 पाॅझिटीव्ह तर 846 कोरोनामुक्त

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 856 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 846 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

- Advertisement -

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 11 हजार 446 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 80 हजार 607 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 65 हजार 207 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 32 बाधितांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी दिवसभरात 28 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

भारत फोर्जकडून 24 गावांना कोविडच्या सुविधा, साधने

भारत फोर्ज लि. पुणे यांच्याकडून सी.एस.आर. निधीतून सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, खटाव व माण तालुक्यातील एकूण 24 गावांना कोविड-19 साठी लागणाऱ्या भौतिक सुविधा व साधनांचे वितरण धामणेर ता. कोरेगाव येथे पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या वितरण प्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, भारत फोर्जच्या लिना देशपांडे, सुनिल माने, शहाजी क्षीरसागर यांच्यासह विविध गावांचे सरपंच उपस्थित होते.