सांगली जिल्ह्यात रूग्ण घटले ः कोरोनाचे नवे १ हजार ७७ पाॅझिटीव्ह तर ४३ मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर गंभीर स्थिती निर्माण झाली होती, मात्र रविवारी रुग्णसंख्या घटल्याने मोठा दिलासा मिळाला. चोवीस तासात 1 हजार 77 रुग्ण आढळून आले. त्यामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या येणे एक लाखाचा टप्पा ही पार केला. तर 43 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय तब्बल 1793 जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 165 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 98, कडेगाव 50, खानापूर 70, पलूस 33, तासगाव 181, जत 118, कवठेमहांकाळ 38, मिरज 150, शिराळा 43 आणि वाळवा तालुक्यात 131 रुग्ण आढळले.

गत आठवड्याच्या सुरुवातीला रुग्णसंख्येत चांगलीच वाढ झाली होती. मात्र आठवडा संपत असताना पुन्हा रुग्णसंख्या कमी होत आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यातील 5 हजार् 571 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. आरटीपीसीआर चाचण्या 2067 पैकी 607 बाधित तर 3505 अँन्टीजेन चाचणीमध्ये 546 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चाचण्यामध्ये मिळून 1077 जण पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यातील 43 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली शहर 6 आणि मिरज शहर 1 व कुपवाड 2, वाळवा तालुक्यातील 11, जत 5, मिरज व पलूस 4, कडेगाव व खानापूर प्रत्येकी 3, तासगाव 2, कवठेमहांकाळ व शिराळा तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक झाले. बाधित रुग्णांपैकी 1793 जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले.

महानगरपालिका क्षेत्रात रुग्णवाढ रविवारीही स्थिर राहिली. नव्याने 165 रुग्ण आढळून आले. सांगली शहरात 108 तर मिरज शहरात 57 रुग्ण आढळले. याशिवाय आटपाडी तालुक्यात 98, कडेगाव 50, खानापूर 70, पलूस 33, तासगाव 181, जत 118, कवठेमहांकाळ 38, मिरज 150, शिराळा 43 आणि वाळवा तालुक्यात 131 रुग्ण आढळले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील 31, सोलापूर 10, कर्नाटक 22, सातारा जिल्ह्यातील 6, पुणे 5 व अहमदनगर जिल्ह्यातील एक रुग्ण आढळला. या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 1 लाख हजार 383 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 2 हजार 922 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 81 हजार 235 जण कोरोनामुक्त रुग्ण आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 16 हजार 226 रुग्ण अॅक्टीव्ह असून त्यापैकी 12 हजार 926 बाधित रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत.

Leave a Comment