रुग्णांना कुठलीही असुविधा होता कामा नये, विभागीय आयुक्तांनी टोचले मनपा अधिकाऱ्यांचे कान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | औरंगाबादेत गेल्या काही दिवसांपासून कोविड सेंटरमधील असुविधा संबंधी सातत्याने वृत्त प्रकाशित होत आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मेल्ट्रोन व एम आय टी येथे सुरू केलेल्या कोविड सेंटर ला सोमवारी अचानक भेट दिली. यावेळी सर्व सुविधांचा आढावा घेऊन, रुग्णांना कुठल्याही असुविधा होता कामा नये. अशा शब्दात त्यांनी मनपा डॉक्टर व अधिकाऱ्यांचे कान टोचले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

गेल्या काही दिवसापासून शहरात झपाट्याने कोरोना रुग्णात वाढ होत आहे. ही वाढ लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने काही ठिकाणी कोविड सेंटर सुरू केले आहेत. त्यापैकी एम आय टी आणि मेल्ट्रोन येथे कोविड सेंटर सुरू झाले तसेच कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. येथे असुविधा संबंधी ओरड होताच केंद्रेकर यांनी तत्काळ एम आय टी व मेल्ट्रोन सेंटरला भेट दिली. तेथे करण्यात आलेल्या सोयी सुविधा बाबत रुग्णालयात फिरून पाहणी केली.

आय सी यु मधील तसेच इतर रुग्णांशी संवाद साधून मिळणा ऱ्या उपचाराबाबत तसेच जेवणा संदर्भात आणि सोयी सुविधा बाबत विचारपूस केली. केंद्रेकरांच्या या अचानक भेटीने मनपा प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच रुग्णांना कुठल्याही प्रकारची असुविधा होता कामा नये. असेही त्यांनी बजावले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment