आदरणीय पाटील साहेब जिंकले हे खरं आहे, पण लोकसेवा काय केली?- उदयनराजे भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला. अतिशय प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत साताकर मतदारांनी श्रीनिवास पाटील यांना पसंती देत मोठ्या मताधिक्क्याने त्यांना निवडून दिले. मात्र, उदयनराजेंना हा पराभव जिव्हारी लागल्याचे आता दिसत आहे.

श्रीनिवास पाटील यांच्या निवडून येण्यायाबाबत पत्रकारांनी आज उदयनराजेंना सवाल केला. चेहऱ्यावर साफ निराशा झळकत असताना त्यांनी श्रीनिवास पाटील यांनाच उद्देशून प्रतिसवाल उपस्थित करत टीका केली. ते म्हणाले कि,’रडीचा डाव मी खेळत नाही. आदरणीय पाटील साहेब जिंकले हे खर आहे पण लोकसेवा काय केली हे लोकांनी पाहिले पाहिजे.’

सोबतच मी निवडणूक हरलो जरी असलो तरी यापुढेही मी कार्यरत राहणार असून खचणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी  व्यक्त केला. दरम्यान, पोटनिवडणुकीत झालेला पराभव उदयनराजेंना अनपेक्षित असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. पराभवानंतर उदयनराजे ट्विटरवर आपली मनातील सल व्यक्त करताना दिसत आहेत.