इंधन दरवाढीचा तेजस्वी यादवांनी केला असा निषेध!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटणा । बिहार विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात. त्यामुळे सर्वच पक्षांनी आता कंबर कसली आहे. याच दरम्यान आरजेडीनं इंधन दरवाढीचा निषेध करत सरकारविरोधात मोर्चा काढला. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहार विधानसभेतील विरोधकांचे नेते तेजस्वी यादव यांनी पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमतीवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी, सायकल आंदोलना दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना सोबत केली.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती सातत्यानं कमी होत आहेत. परंतु, भारतात मात्र पेट्रोल डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत. यावर विरोधी नेते तेजस्वी यादव यांनी नागरिकांचं लक्ष वेधलं. भारत सरकार जनतेला वेठीस धरत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. आम्ही गरीब शेतकरी आणि मजुरांबद्दल बोलत आहोत मात्र केंद्र सरकार उद्योगपती आणि धनिकांविषयी बोलत आहे. त्यामुळेच, सांकेतिक स्वरुपात आम्ही याचा विरोध करत आहोत, असंही त्यांनी म्हटलं.

जनहिताच्या राष्ट्रीय मुद्द्यांनी पक्षाला राज्यातही फायदा मिळू शकतो, हे आरजेडीच्या लक्षात आलंय. त्यामुळे पाटण्यात हे प्रदर्शनाला नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला. दरम्यान, आज सलग १९ व्या दिवशी डिझेलच्या किंमतीत वाढ झालीय. आजही डिझेलमध्ये १४ पैसे तर पेट्रोलमध्ये १६ पैशांची वाढ झालीय. गेल्या १९ दिवसांत डिझेलच्या किंमतीत १०.६२ रुपये प्रति लीटरची वाढ झालीय. तर पेट्रोलची किंमत ८.६६ रुपयांनी वाढलीय. पाटण्यात पेट्रोलची किंमत ८२. ९१ रुपये प्रती लीटर आणि डिझेलची किंमत ७७ रुपये प्रती लीटर आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment