हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Personal Loan : आपल्या आयुष्यात आपल्याला अनेकदा एखाद्या आणीबाणीच्या प्रसंगी पैशांची गरज भासते. अशा वेळी पर्सनल लोन खूपच फायदेशीर ठरते. याशिवाय इतर कर्जांच्या तुलनेत पर्सनल लोन सहजरित्या उपलब्ध देखील होते. तसेच यासाठी काही गहाण ठेवण्याची देखील गरज नसते. मात्र पर्सनल लोन हा एक चांगला उपाय दिसत असला तरी याच्या परतफेडीसाठी दीर्घकालावधीचा EMI चा त्रास सहन करावा लागू शकतो.
सध्याच्या काळात व्याजदरात सतत वाढ होते आहे. अशा परिस्थितीत, जर आपण Personal Loan घेतले असेल आणि त्यावर जास्त व्याज द्यायचे नसेल तर आपल्याला ते कर्ज वेळेआधीच बंद करता येईल. ज्याला प्री-क्लोजर असे म्हंटले जाते. यामध्ये कर्जाची मुदत संपण्याआधीच संपूर्ण रक्कम भरली जाते. आज आपण पर्सनल लोन प्री-क्लोज करण्याविषयीची माहिती जाणून घेउयात…
लोन प्री-क्लोज करण्यापूर्वी लक्षात घ्या ‘या’ गोष्टी
इथे हे जाणून घ्या की, प्रत्येक बँकांचे लॉक-इन कालावधी वेगवेगळे असतात, ज्याआधी आपल्याला कर्ज बंद करता येईल. मात्र, काही बँका किंवा कर्ज देणाऱ्या संस्थांकडून व्याजाच्या रकमेवरील तोटा भरून काढण्यासाठी प्री-क्लोजर फी देखील आकारली जाते. तसेच आपल्या CIBIL स्कोअरवर परिणाम होत असल्याने आपण घेतलेले Personal Loan योग्य पद्धतीने बंद करणे महत्त्वाचे आहे. या संदर्भात काही अडचण आल्यास संबंधित बँकेशी संपर्क साधता येईल.
अशा प्रकारे प्री-क्लोज करा
आपले Personal Loan प्री-क्लोज करण्यासाठी सर्वांत आधी संबंधित बँकेच्या शाखेत जा. इथे आयडी प्रूफ, शेवटच्या ईएमआय पेमेंटचे बँक स्टेटमेंट आणि पुन्हा पेमेंटसाठी चेक किंवा डिमांड ड्राफ्ट यासारखी कागदपत्रे द्यावी लागतील. जेव्हा आपण चेक किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे कर्जाची शिल्लक रक्कम भरता तेव्हा बँकेकडून एक एकनॉलेजमेंट लेटर मिळते. जे काळजीपूर्वक जपून ठेवावे लागेल. कर्ज प्री-क्लोज केल्याच्या काही दिवसांनी बँकेकडून आपल्याला लोन एग्रीमेंट पाठवले जाईल.
EMI पेक्षा जास्त पैसे द्यावे का ???
जर आपल्याकडे कर्जाच्या EMI पेक्षा जास्त रक्कम असेल आणि ती कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरायची असेल तर आपल्याला ती वापरता येईल. यामुळे आपल्या कर्जाचा कालावधी कमी होईल किंवा EMI ची रक्कम कमी होईल. या प्रकारच्या कर्जाच्या परतफेडीला Personal Loan पार्ट प्री-पेमेंट असे म्हंटले जाते. पर्सनल लोनचे अर्धवट पेमेंट करण्यासाठी देखील, संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन बँक अधिकाऱ्याला कळवावे लागेल. यानंतर, बँकेकडून आपल्याला अपडेट केलेल्या EMI किंवा कर्जाच्या नवीन कालावधीची माहिती दिली जाते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/interest-rates/loan-schemes-interest-rates/personal-loans-schemes
हे पण वाचा :
Indusind Bank कडून FD वरील व्याजदरात वाढ, पहा नवीन व्याजदर
PF Balance : आपल्या पीएफ खात्यामध्ये किती पैसे जमा झालेत ??? ‘या’ 4 प्रकारे तपासा
Senior Citizen FD Rates : ज्येष्ठ नागरिकांना आता मिळणार 8% रिटर्न, ‘या’ बँकेने FD वरील व्याजदर वाढवले
Wheat and Floor Prices : गहू अन् पिठाचे भाव लवकरच कमी होणार??? याबाबत अन्न सचिव म्हणाले कि…
Budget 2023: 35 हायड्रोजन ट्रेन की 500 वंदे भारत एक्सप्रेस, जाणून घ्या यंदाच्या अर्थसंकल्पातून रेल्वेला काय अपेक्षा आहेत