Budget 2023: 35 हायड्रोजन ट्रेन की 500 वंदे भारत एक्सप्रेस, जाणून घ्या यंदाच्या अर्थसंकल्पातून रेल्वेला काय अपेक्षा आहेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Budget 2023 : 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पाकडे नेहमीप्रमाणेच सामान्य नागरिकही लक्ष देऊन आहेत. यावेळी इतर क्षेत्रांप्रमाणेच रेल्वेलाही काही खास आशा आहेत. कारण यावेळीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांकडून रेल्वेसाठी 500 वंदे भारत एक्सप्रेस आणि 35 हायड्रोजन ट्रेनची घोषणा केली जाण्याची शक्यता असल्याचे म्हंटले जात आहे. यासोबतच 4000 नवीन ऑटो मोबाईल कॅरिअर कोच आणि 58000 वॅगन ट्रेनची भेटही मिळू शकेल.

Union Budget 2023 | Central government will change the slab of income tax,  tax payers will get benefit; read full news - Verve times

त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यातही सवलत दिली जाण्याची शक्यता आहे. एका मीडिया रिपोर्ट्स नुसार, यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1.9 लाख कोटींचा निधी मिळण्याची शकतो. चला तर मग यंदाच्या अर्थसंकल्पात आणखी काय घोषणा करता येतील त्याबाबत जाणून घेऊयात…

Railways seeks budget outlay of Rs 2 trillion in FY24 | The Financial  Express

अर्थसंकल्पात रेल्वेसाठी काय खास असणार ???

हे लक्षात घ्या कि, 2017 साला आधी रेल्वेसाठी एक वेगळा अर्थसंकल्प सादर केला जात असे. मात्र आता त्याला केंद्रीय अर्थसंकल्पमध्येच विलीन केले गेले आहे. अशा परिस्थितीत रेल्वेला या अर्थसंकल्पाकडून भरपूर अपेक्षा आहेत. ज्यामध्ये रेल्वे प्रवाशांना भाड्यात सूट, रेल्वेच्या नवीन लाईन, गेज बदल, विद्युतीकरण, सर्वोत्तम सिग्नलिंगसाठी अतिरिक्त निधी दिला जाऊ शकेल. यासोबतच रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी देखील काही खास घोषणा केल्या जाऊ शकतील.Budget 2023

High-speed rail in India - Wikipedia

बुलेट ट्रेनबाबत घोषणा

यंदाच्या अर्थसंकल्पात सरकार कडून वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांबरोबरच हायड्रोजन ट्रेनसाठीही विशेष घोषणा केली जाणार आहे. याबरोबरच बुलेट ट्रेनसाठी देखील बजेट वाढवण्यावर भर देण्यात येईल, अशी आशा रेल्वेला आहे. तसेच वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या विदेशातही निर्यात करण्याची योजना सरकार आणू शकते. याशिवाय त्याचा वेग वाढवण्याबाबतही घोषणाही केल्या जाऊ शकतील. Budget 2023

How Indian Railways Is Going About Station Redevelopment Across The Country

पायाभूत सुविधांवर भर

यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर भर दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. याशिवाय आधुनिकीकरण, विद्युतीकरण, प्लॅटफॉर्म डेव्हलपमेंट आणि छोट्या लाईन्सचेही अपग्रेडेशनसाठीही काही घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. Budget 2023

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiabudget.gov.in/doc/bh1.pdf

हे पण वाचा :
118 वर्षे जुन्या City Union Bank कडून FD वरील व्याजदरात वाढ, पहा नवीन व्याजदर
‘या’ Tax Saving Scheme मध्ये गुंतवणूक करून मिळवा कर सवलत !!!
विमानातील लघवीप्रकरणी Air India ला 30 लाखांचा दंड, DGCA ची मोठी कारवाई
Ration Card : मोफत रेशन घेणाऱ्या करोडो लोकांसमोर उभे नवीन संकट, जाणून घ्या त्याविषयीची माहिती
Kisan Credit Card म्हणजे काय ??? याद्वारे अशा प्रकारे मिळवा स्वस्त दरात कर्ज !!!